साइनाची यशस्वी घोडदौड...
PR PR |
बीजिंग ऑलिंपिकमधील अनुभवाचा साइनाने फायदा करून घेत आपल्या खेळात बरीच सुधारणा करून घेतली आहे. यात तिची जिद्द व मेहनत वाखाणण्याजोगी आहे. तिचे प्रशिक्षक पी गोपीचंद यांनी तिच्यासाठी घेतलेले परिश्रम व तिला सर्व प्रकारे सहकार्य
करण्यात आंध्र प्रदेश सरकारचा मोठा वाटा आहे. गतवर्षी चिनी ताइपैसारख्या पुरस्कारांना गवसणी घालणाऱ्या साइनाची यंदाही यशस्वी घोडदौड सुरूच होती.
सुपर सिरीज पुरस्कार जिंकणारी हैदराबादची 19 वर्षीय साइना ही पहिली भारतीय खेळाडू आहे. जून 2009 मध्ये इंडोनेशिया ओपन पुरस्कारावर तिने नाव कोरले होते. यंदाचा 'अर्जुन' पुरस्कार देऊन तिला गौरविण्यात आले तर तिचे गुरू पी. गोपीचंद हे 'द्रोणाचार्य'
पुरस्काराचे मानकरी ठरले.
PR
PRसाइनाने मलेशिया सुपर सिरीज, स्विस ओपन व इंडियन ओपनच्या क्वार्टर फायनल गाठली. तिच्या शानदार कामगिरीमुळे भारत सुदीरमन चषकात ग्रुप दोनपर्यंत मजल मारता आली. मात्र जूनमध्ये सिंगापूर ओपनमध्ये अंतिम आठमध्ये वांग लिनकडून साइनाला पराभव पचवावा लागला होता. मात्र इंडोनेशियामध्ये चायनीज प्रतिद्वंद्वीला धूळ चाखवत तिने पहिला सुपर सिरीज पुरस्कारावर नाव कोरले.
भारतीय अधिकारी व विश्व बॅडमिंटन महासंघाच्या 'कोल्ड वार'ची झळ मात्र साइनाला पोहचली व चीन मास्टर्स स्पर्धा तिला मुकावी लागली. त्यानंतर डेनमार्क व फ्रान्समध्ये झालेल्या सुपर सिरीजच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहचून तिने ऑक्टोबरमध्ये विश्व
मानांकनात सहावे स्थान पटकावले होते.
वर्षाच्या शेवटी साइनाने विश्व सुपर सिरीज मास्टर्सच्या सेमीफायनल गाठली होती. महिला एकेरी वर्गात तिने तिरंगा फडकविला तर मिश्र दुहेरीत ज्वाला व दीजू या जोडीने जेतेपद मिळविले.
वर्षाच्या शेवटी साइनाने लखनऊ येथे सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्यामुळे पुण्याच्या अदिती मुटाटकरला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. याशिवाय साइना यंदाच्या सीएनएन-आयबीएन 'स्पोर्ट्स पर्सन ऑफ द
इयर' ह्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
PR
PRऑगस्ट 09 मध्ये साइनाच्या अंगावर कांजण्या (चिकन पाक्स) उठल्या होत्या. त्यामुळे तिला काही काळ विश्रांती घ्यावी लागली. अशा लहान-सहाण समस्या वगळता साइनासाठी 2009 हे वर्ष मस्तच गेलं... साइनाला 'वर्ल्ड नंबर वन'ची बॅडमिंटनपटू बनायचे आहे.
त्यादृष्टीने ती मेहनत घेत असून तिची घोडदौड सुरू आहे. तिला तिच्या इच्छेप्रमाणे यश मिळो... हीच तिला नववर्षानिमित्त सदिच्छा!
