शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (12:24 IST)

युक्रेनचा दावा - रशियाने 4300 सैनिक आणि 146 रणगाडे गमावले

रशियाचे सैन्य युक्रेनवर हल्ले करत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशिया लवकरच राजधानी कीववर ताबा मिळवेल अशी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना युक्रेन सोडण्याची ऑफर दिली, परंतु त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की ते रशियाविरुद्ध लढत राहणार आहे. दरम्यान, युक्रेनने युद्ध सुरू झाल्यापासून 4,300 रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. बेल्जियमने सर्व रशियन एअरलाइन्ससाठी हवाई क्षेत्र बंद केले.
 
युक्रेनचे उप संरक्षण मंत्री म्हणाले की, युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने सुमारे 4,300 सैनिक आणि 146 रणगाडे गमावले आहेत. फिनलंड आणि डेन्मार्कही रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद करणार आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, युद्धाबाबत रशियाची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील जागा काढून घेतली पाहिजे.
 
त्याच वेळी, कीव शहराच्या राज्य प्रशासनाने एका निवेदनात म्हटले आहे की रविवारी सकाळपर्यंत राजधानी कीव युक्रेनियन सैन्याच्या ताब्यात आहे. प्रशासनाचे प्रथम उपप्रमुख, मायकोला पोवोरोझनिक यांनी सांगितले की, कीवमधील परिस्थिती शांत आहे, राजधानी पूर्णपणे युक्रेनियन सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे, शिन्हुआ वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. रात्री उभय सैन्यात बराच संघर्ष झाला.