शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

Pitru Paksha 2023: पितृपक्षात पितरांना जल अर्पण करण्याची वेळ आणि योग्य पद्दत, मंत्र जाणून घ्या

Pitru Paksha 2023 पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असे म्हणतात. या पंधरवड्यात पितरांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध करण्याची परंपरा असते. श्राद्धात पितरांच्या नावाचा जप करून अन्न, पाणी, वस्त्र आणि इतर वस्तूंचे दान केले जाते. पितरांच्या पुण्यतिथीला श्राद्ध केले जाते. पितृ तर्पण पिंड दानाद्वारे केले जाते, ज्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. पिंडदानाच्या माध्यमातून पितरांचे आत्मे अन्न आणि वस्त्राचा आनंद घेतात आणि मुलांच्या सुखाची काळजी घेतात, असा विश्वास आहे. पितृपक्षात पिंड दान केल्याने पितरांचे आत्मे तृप्त होतात आणि त्यांना शांती मिळते.
 
पितरांना जल अर्पित करण्याची योग्य वेळ
पौराणिक ग्रंथांनुसार हाताच्या ज्या भागावर अंगठा असतो त्या भागाला पितृ तीर्थ म्हणतात. पितरांना जल अर्पित करण्याची योग्य वेळ सकाळी 11:30 ते 12:30 या दरम्यान असते.
 
पितृपक्ष 2023
29 सप्टेंबर रोजी भाद्रपद पोर्णिमा दुपारी 03 वाजून 26 मिनिटापर्यंत आहे नंतर कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी सुरु होईल जी 30 सप्टेंबर दुपारी 12 वाजून 21 मिनिटापर्यंत आहे. 
 
पिंडदान करण्याची विधी
पिंड दान करणाऱ्या व्यक्तीने पांढरे कपडे परिधान करावेत. तांदूळ, दूध, तूप, मध आणि गूळ एकत्र करून त्याचे गोल गोळे बनवावेत. पिंड बनवल्यानंतर तांदूळ, कच्चा कापूस, दही, दूध, अगरबत्ती इत्यादी साहित्याने पिंडाची पूजा करावी. यानंतर उजव्या खांद्यावर पवित्र धागा धारण करून पितरांचे ध्यान करावे.
 
पितृपक्षात पितरांना पाणी देण्याची पद्धत
 
पितृपक्ष म्हणजेच श्राद्धाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षादरम्यान पितरांचे स्मरण करण्यासाठी श्राद्ध विधी केले जातात. पितृपक्षात पितरांना नैवेद्य दाखवून आणि श्राद्धविधी केल्याने मोक्षप्राप्ती होते. या काळात श्राद्ध केवळ पितरांच्या मोक्षासाठीच नाही तर त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी देखील केले जाते. पितृपक्षात पितरांना श्रद्धेने जल अर्पण करण्याची परंपरा आहे.
 
पितृपक्षात तर्पण विधी
पितृपक्षात दररोज पितरांना जल अर्पित करावे.
तर्पणसाठी कुश, अक्षदा, जवस आणि काळे तीळ वापरावे. तर्पणसाठी पितरांना प्रार्थना करावी आणि चुकींसाठी क्षमा मागावी.
 
पितृपक्षात श्राद्ध कर्म करण्यांनी हे लक्षात ठेवावे
पितृपक्षात केस आणि दाढी कापू नये.
पितृपक्षात घरीच सात्विक भोजन तयार करावे.
तामसिक भोजन पूर्णपणे टाळावे.
 
पितृ प्रार्थना मंत्र
पितृभ्य:स्वधायिभ्यः स्वधा नमः .
पितामहेभ्य:स्वधायिभ्यः स्वधा नमः .
प्रपितामहेभ्य:स्वधायिभ्यः स्वधा नमः .
सर्व पितृभ्यो द्ध्या नमो नमः ..
 
ॐ नमो व :पितरो रसाय नमो वः
पितरः शोषाय नमो वः
पितरो जीवाय नमो व:
पीतर: स्वधायै नमो वः
पितरः पितरो नमो वो
गृहान्न: पितरो दत्त: सत्तो वः