सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Updated : रविवार, 25 सप्टेंबर 2022 (10:35 IST)

Sarva Pitru Amavasya 2022: सर्व पितृ अमावास्याचे महत्त्व आणि उपाय

shradha
सर्व पितृ अमावस्या 2022: सर्व पितृ अमावस्या हा पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्षाचा शेवटचा (25.09.22) दिवस आहे. याला विसर्जनी अमावस्या असेही म्हणतात. या वर्षी सर्व पितृ अमावास्या , रविवार  25 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी ज्या पूर्वजांची तारीख नातेवाइकांना माहीत नाही त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी तरपण केल्याने पूर्वज प्रसन्न होतात
 
धार्मिक मान्यतेनुसार,श्राद्ध किंवा तरपण केल्याने पूर्वज प्रसन्न होतात. असे म्हटले जाते की या योगात श्राद्ध आणि दान केल्याने, पूर्वजांची भूक पुढील 12 वर्षे शांत होते. 
 
सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी हे उपाय करा-
सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी पूर्वजांसाठी श्राद्ध करावे आणि तूप दान करावे. असे मानले जाते की असे केल्याने, पूर्वज पुढील 12 वर्षे समाधानी असतात. याशिवाय गरीब आणि गरजूंना दान द्यावे. असे मानले जाते की अन्न आणि वस्त्र दान केल्याने जीवनातील सर्व त्रास दूर होतात.