सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Updated : रविवार, 25 सप्टेंबर 2022 (10:24 IST)

Sarva Pitru Amavasya 2022 पितृ श्रापातून मुक्ती होण्यासाठी हे करा

shradha
‘पितरो यस्य संतुष्टा:, संतुष्टा: सर्वदेवता: अर्थात पितरांची संतुष्टीमुळे देव देखील संतुष्ट होतात. ज्यांना आपल्या पितरांची तिथी ज्ञात नसते ते सर्वपितृ अमावस्येला तरपण आणि श्राद्ध करतात.
 
यंदा 25 सप्टेंबर रोजी सर्वपितृ अमावस्या येत आहे. या निमित्ताने तरपण करुन पितरांनिमित्त दान-धर्म, भोजन आदि केले जाते.
 
या दिवशी पितृ दोष शांती साठी त्रिपिण्डी श्राद्ध करण्यासह गीता पाठ, रुद्राष्ट्राध्यायीचे पुरुष सूक्त, ब्रह्मसूक्त इतर पठण करावे. पिंपळाच्या झाडाच्या मुळात विष्णूंचे पूजन करावे. पितृ श्रापाहून मुक्तीसाठी या दिवशी एक पिंपळाचे झाड देखील लावण्याचे सांगितले जाते.