रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

पितृदोष शांतीसाठी सोपे उपाय

प्राचीन ज्योतिष ग्रंथाप्रमाणे पितृदोष सर्वात मोठा दोष मानला गेला आहे. यापासून पीडित व्यक्तीचं जीवन कष्टदायक असतं. ज्याच्या कुंडलीत हा दोष असतो त्याला पेश्याचा अभाव असतो आणि त्याला मानसिक ताणाला सामोरे जावं लागतं.
 
साधारणात: पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात पण कोणी एवढं खर्च करण्यात सक्षम नसेल तर काही सोपे आणि स्वस्त उपाय करून याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. 
 
1. कुंडलीत पितृ दोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाइकांचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि प्रार्थना करावी.

2. स्वर्गीय नातेवाइकांच्या निर्वाण तिथीवर गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन करवावे. भोजनात मृतात्म्याचा आवडता पदार्थ सामील करावा.



3. त्यांच्या तिथीवर शक्य असल्यास गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करावे.


4. पिंपळाच्या झाडावर दुपारी जल, फूल, अक्षता, दूध, गंगाजल, आणि काळे तीळ चढवावे आणि स्वर्गीय नातेवाइकांचे स्मरण करून त्याचा आशीर्वाद घ्यावा.


5. संध्याकाळी दिवा लावून नाग स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र, रुद्र सूक्त किंवा पितृ स्तोत्र व नवग्रह स्तोत्राचा पाठ करावा.


6. सोमवारी सकाळी अंघोळ करून नंग्या पायांनी शिव मंदिरात जाऊन आकड्याचे 21 फुलं, कच्ची लस्सी, बेलपत्र वाहून शिवाची पूजा करावी. 21 सोमवार हा नियम केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो.


7. दररोज इष्ट देवता आणि कुळ देवतांचे पूजन केल्याने दोष दूर होतो.


8. एखाद्या गरीब कन्येचा विवाह लावल्याने किंवा एखाद्या रूग्णाला मदत केल्यानेही लाभ मिळेल.


9. रसत्यावर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केल्यानेपण दोषापासून मुक्ती मिळते.


10. पिंपळाचे किंवा वडाचे झाड लावावे. 


11. पूर्वजांच्या नावावर मंदिर, शाळा, धर्मशाळा निर्माण करण्यासाठी हातभार लावल्याने किंवा गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केल्यानेही लाभ मिळेल.