श्रावणात हिरवा रंग परिधान घालणे शुभ का मानले जाते?  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने विशेष फळ मिळते. हा महिना पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित आहे. याशिवाय या काळात पाऊस पडल्याने निसर्गही हिरवागार राहतो. श्रावणात स्त्रिया अनेकदा हिरव्या रंगाचे कपडे तसेच बांगड्या घालतात. हा रंग धारण करणे हे शिवभक्तीचे प्रतीक मानले जाते.
				  													
						
																							
									  
	 
	श्रावण महिना खूप खास मानला जातो. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची उपासना केल्याने विशेष फळ मिळते. या काळात पडणारा श्रावणी पाऊसही खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात हिरवा रंग प्रमुख मानला जातो. या काळात निसर्गही हिरवागार होतो. हा रंग नशिबाचे प्रतीक आहे. चला तर जाणून घेऊया या महिन्यात हिरव्या रंगाचे काय महत्त्व आहे.
				  				  
	 
	श्रावणात हिरव्या रंगाचे काय महत्व आहे?
	महिला या काळात हिरव्या बांगड्या आणि हिरवे कपडे घालतात.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	श्रावणात लावलेली मेहंदी देखील हिरव्या रंगाची असते. हे शुभाचे प्रतीक मानले जाते.
	हिरवा रंग विवाह तसेच सवाष्णीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
				  																								
											
									  
	हिरवा रंग देवांना प्रसन्न करतो. भगवान शिव हिरवाईमध्ये ध्यानाच्या प्रेमासाठी ओळखले जातात.