ganesh chaturthi
✕

Green color in Shravan maas : श्रावणात का आवडतो हिरवा रंग, जाणून घेऊ या हिरव्या रंगाचे महत्त्व..

Updated: शुक्रवार, 17 जुलै 2020 (11:20 IST)
 
हिरवा रंग संतुलन, निसर्ग, वसंत, आणि पुनर्जन्माचे प्रतीक मानला गेला आहे. अमेरिकेत ग्रीन पार्टी(Green Party)पर्यावरणीय आणि प्रगतिशील कारणांवर अवलंबून आहे. जपान मध्ये हिरव्या रंगाला शाश्वत जीवनाचे रंग मानले जाते. इस्लाममध्ये याला पवित्र रंग मानले गेले आहेत.जे सन्मान आणि पैगंबर मुहंमदाचे प्रतिनिधित्व करतं. 
 
हिरवा रंग आयर्लंडमध्ये प्रतीकांचा आहे जे मोठ्या हिरव्यागार टेकड्यांसह आयर्लंडच्या संरक्षक संत, सेंट पेट्रिकचे प्रतिनिधित्व करतं. चीन मधील हरिताश्म दगड पुण्य आणि सौंदर्यतेचे प्रतिनिधित्व करतं. पुर्तगाल मध्ये ह्याला आशेचा रंग मानला जातो. अश्या प्रकारे वेगवेगळ्या देशात ह्याला कोणत्या न कोणत्या स्वरूपात विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. 
 
गडद हिरवा रंग पुरुषत्व दर्शवितो आणि हलका हिरवा रंग स्त्रीत्व दर्शवितो. हिरव्या रंगाचे विविध प्रकाराचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. गडद हिरव्या रंगाला संपत्तीशी जोडलं जातं, विशेषतः अमेरिकेत मुद्रांच्या कागदाचा रंग देखील हिरवा आहे. संपत्तीशी निगडित असल्याने हिरव्या रंगाला लोभ, मत्सर आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक देखील मानलं जातं. 
 
चमकदार हिरवा रंग आशा आणि सुरक्षिततेशी निगडित असतं. हा रंग स्थैर्यता आणि सहनशक्तीचे प्रतिनिधित्व करतं, तरी हा रंग निसर्गाशी जुळलेला आहे. चमकदार हिरवा रंग बहुदा झाड आणि पर्यावरणास उपयुक्त मानलं जातं, म्हणूनच विपणनासाठी वेगवेगळ्या सामानाच्या पॅकेजिंग(Packaging) मध्ये देखील या रंगाचा वापर केला जातो. 
 
पिवळटसर हिरव्या रंगात पिवळ्या रंग जेवढा जास्त हिरवा असतो तो तेवढेच जास्त सकारात्मकतेचे प्रतीक असते. या रंगाला बऱ्याचदा व्यवसायाचे प्रतिनिधित्व करणारा देखील मानतात. तर काही लोकं ह्याला मत्सराशी जोडतात. 
 
ऑलिव्ह हिरवा रंग निसर्गाशी निगडित आहे. हा रंग शांतीचे प्रतिनिधित्व करतो. अक्षरशः: बघितल्यावर ऑलिव्ह ही एक नैसर्गिक वनस्पती आहे, जी हिरव्या रंगाची असते आणि शांततेशी निगडित असते. 
 
बऱ्याचशा क्षेत्रात हिरव्या रंगाचे विशेष महत्त्व आहेत. क्रीडेच्या क्षेत्रात हिरवा रंग ऑटो रेसिंग (Auto Racing)मध्ये रेस सुरू करण्यासाठी किंवा पुन्हा सुरू करण्यासाठी संकेतांच्या रूपात वापर करण्यात येतं. जुडो (Judo)मध्ये ग्रीन बेल्ट हिरव्या झाडांचे प्रतीक आहे. ज्या प्रमाणे एक हिरवे झाड सर्वात उंच सजीव वस्तू आहे, त्याच प्रकारे ज्ञानाचा शोध आपण स्वतःच घेतला पाहिजे जेणे करून आपल्याला उच्च लक्ष्याची प्राप्ती मिळू शकेल. 
 
हिरवा रंग सुप्रसिद्ध ब्रँडचे देखील प्रतीक आहे ज्यामध्ये एच, एन्ड आर ब्लॉक (H&R Block), बीपी (BP), हेनेकेन (Heineken), स्टारबक्स (Starbucks), दी मास्टर्स गोल्फ टूर्नामेंट (The Masters Golf Tournament), रोलिंग रॉक (Rolling Rock), गार्नियर फ्रुक्टिस (Garnier Fructis) मुख्य आहेत. 
 
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या देशाच्या तिरंग्यामध्ये देखील ह्याचा समावेश आहे. जे आपल्याला जीवापाड आवडतो. जो आपल्या देशाचा मान, अभिमान, वैभव आहे. हे आपल्या भारतमातेच्या पदराची सावली आणि आपल्या भारतदेशाच्या डोक्यावरचे मुकुट आहे. 

सर्व पहा

Shardiya Navratri 2026 Wishes Marathi शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा

मोक्षधाम ब्रह्मकपाल : पितृदोषातून कायमची मुक्ती! जाणून घ्या १० गूढ रहस्ये

प्रसिद्ध देवी मंदिरांमधील या अनोख्या परंपरा तुम्हाला माहीत आहेत का?

Pitru Diwali 2026 पितृ दिवाळी कधी? 'दीपदान' विधी आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या

Shraddha Paksha 2026: श्राद्ध पक्षातील एकादशी श्राद्धाचे महत्त्व, श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते ते जाणून घ्या

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments