सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: बुधवार, 15 जुलै 2020 (11:53 IST)

श्रावण महिना आणि श्रीकृष्ण यांच्यात काय संबंध आहे जाणून घ्या 10 खास गोष्टी

हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढाच्या महिनेनंतर श्रावण येतं. श्रावण आणि भाद्रपद 'मेघऋतू' किंवा 'पावसाळ्याचा' महिना आहे. पावसाच्या सरी एक नवे आयुष्य घेऊन येतात. या महिन्यापासून चातुर्मास लागतो. श्रावण हा संपूर्ण महिना भगवान शिवाचा असतो. पण या महिन्याचा संबंध श्रीकृष्णाशी देखील आहे. 
 
1 रासलीला : या महिन्याला प्रेम आणि नव्या आयुष्याचा महिना देखील म्हणतात. मोराच्या पायात नृत्य बांधले जातं. सर्व सृष्टी नृत्य करू लागते. वसंत ऋतू नंतर श्रीकृष्ण याच महिन्यात रास मांडतात. ब्रजमंडळातील श्रावण महिन्यात साजरी केली जाणारी रासलीला आकर्षक असे. वृंदावनाचे प्रमुख आकर्षण जगप्रसिद्ध रासाचार्यानी सादर केलेली रासलीला आहे. ज्यामध्ये कृष्णाच्या लीलेचे जिवंत सादरीकरण करतात. 
 
2 श्रावण आणि भाद्रपद वर्षाऋतूचे महिने आहेत. ह्याच ऋतूमध्ये श्रावणातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमीचा सर्वात मोठा सण येतो. 
 
3 मनवांछित वर देतात कृष्ण : आषाढ कृष्ण पक्षाच्या अष्टमी पासून ते श्रावण कृष्ण पक्षाच्या अष्टमी म्हणजेच जन्माष्टमी पर्यंत म्हणजे एक महिना श्रीकृष्णाची पूजा केली जाते. असे म्हणतात की या काळात कृष्णाची उपासना करणार्‍याला मोक्षप्राप्ती होते. अशी आख्यायिका आहे की या महिन्यात भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि इच्छित वर देतात. 
 
4 राशी प्रमाणे कृष्णाची उपासना करा : या महिन्यात राशीच्या अनुरूप श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. जसे -
मेष : ॐ विश्वरूपाय नम: 
वृषभ : ॐ उपेंद्र नम: 
मिथुन : ॐ अनंताय नम: 
कर्क : ॐ दयानिधि नम: 
सिंह : ॐ ज्योतिरादित्याय नम: 
कन्या : ॐ अनिरुद्धाय नम: 
तूळ : ॐ हिरण्यगर्भाय नम: 
वृश्चिक : ॐ अच्युताय नम: 
धनू : ॐ जगतगुरवे नम: 
मकर : ॐ अजयाय नम: 
कुंभ : ॐ अनादिय नम: 
मीन : ॐ जगन्नाथाय नम: 
 
5 ब्रज मंडळा मध्ये श्रावण उत्सव : श्रीकृष्णाचे शहर मथुरा, गोकूळ, बरसाना आणि वृंदावनात श्रावणाच्या उत्सव साजरा केला जातो. ब्रजमंडळाच्या या उत्सवाला कृष्ण जन्माष्टमीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. जसं की या उत्सवामध्ये हिंडोळामध्ये झोपाळा, घटाये, रासलीला आणि गौरांगलीला आयोजित करतात. इथे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातून देऊळात दोन चांदीचे नाणी आणि एक सोन्याचा हिंदोळा लावतात. यामध्ये भगवान श्रीकृष्णाला झुलवतात. या महिन्यात श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा करतात. हिंदोळा सजविण्याची आणि बालमुकुंदाला झोपाळ्यात बसवून झोके देण्याची परंपरा आहे. या महिन्यात रासलीला आयोजित करतात. 
 
6 घटा उत्सव : श्रावणात इथे साव उत्सवाव्यतिरिक्त घटा उत्सव देखील आयोजित करतात. यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या आकर्षक घटामध्ये श्रीकृष्णाचे लीलांचे सादरीकरण होतात. देऊळाच्या कालीघटाचे दर्शन करण्यासाठी लक्षावधी लोकं या देऊळात येतात. 
 
7 हरियाली तीज : ब्रज मंडळात विशेषतः वृंदावनात हरियाली तीजची धूम असते. इथले प्राचीन राधावल्लभ देऊळात हरियाली तीज पासून रक्षा बंधन पर्यंत चांदी, केळी, फुल आणि पानांचे हिंदोळे तयार करतात. पवित्रा एकादशीला ठाकूरजी पवित्रा धरतात. हरियाली तीज पासून पंचमी पर्यंत ठाकूरजी चांदी, जडवू, फुले-पानांचा हिंदोळ्यात झुलतात. 
 
8 कृष्णासह बलराम देखील झुलतात : ब्रजमंडळाच्या इतर देऊळात जिथे हिंदोळ्यात कृष्ण झुलतात तिथेच ब्रजमध्ये असे देखील देऊळ आहे, जेथे पूर्ण श्रावण महिन्यात हिंदोळ्यामध्ये कृष्णासह बलराम देखील झुलतात. दाऊजींचे देऊळ बलदेव आणि गिरीराज मुखारविंद देऊळ जतीपुरामध्ये हिंदोळ्यात ठाकूरजींच्या मूर्तीच्या प्रतिबिंबाला झुलवतात. 
 
9 कृष्णाच्या देऊळात श्रावणाचा उत्सव : ज्या प्रमाणे शिवाच्या शिवालयाला श्रावणाच्या महिन्यात चांगल्या प्रकारे सजवून भगवान शंकराची पूजा करतात त्याच प्रकारे जगभरातील कृष्णाच्या देऊळात भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि आराधना केली जाते. हा पूर्ण महिना कृष्णाच्या लीलांनी जोडलेला महिना मानला जातो. 
 
10 द्वारिकाधीशाची पूजा : अशी आख्यायिका आहे की या श्रावणाच्या महिन्यात द्वारकाधीशाची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. उपासकाला आरोग्याचे वरदान मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.