शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जुलै 2020 (19:40 IST)

मंगळागौरी व्रत-कैवल्य करण्याचे 10 सोपे उपाय

मंगळागौरी व्रत-कैवल्याचे 10 सोपे उपाय केल्याने, वैवाहिक जीवनातील येणारे सर्व अडथळे दूर होण्यास मदत मिळते ..
मंगळाच्या योगामुळे आपल्या वैवाहिक जीवनात अडथळा येत असल्यास किंवा लग्न होण्यास वेळ लागत असल्यास श्रावणात येणाऱ्या मंगळवारचे मंगळागौरी व्रत- कैवल्य आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
मंगळागौरीचे व्रत-कैवल्याची पूजा श्रावणातील दर मंगळवारी केली जाते. या दिवशी गौरी म्हणजे पार्वतीची पूजा केली जाते. हे व्रत मंगळवारी करतात, म्हणून ह्याला मंगळागौरीचे व्रत असे म्हणतात. या दिवशी मंगळाचा दोष टाळण्यासाठी मंगळागौरी व्रत, मंत्रजप आणि पुढील उपाय केल्यास आपल्या वैवाहिक जीवन सुरळीत करण्यात मदत मिळते.   
चला जाणून घेऊ या.. 10 हे खास उपाय :
1 जर आपल्या कुंडलीत मंगळ 1, 4, 7, 8 आणि 12 व्या घरात असल्यास मंगळाचे दोष बनतात. म्हणून मंगळवारी मंगळागौरी तसेच मारुतीच्या पायथ्याचे शेंदूर घेऊन आपल्या कपाळी लावावे.
2 मंगळागौरीच्या उपवासाच्या दिवशी एकाच वेळी सात्त्विक आणि शाकाहारी आहार घ्यावा.
3 मंगळवारी बांधवांना मिठाई खाऊ घातल्याने मंगळ शुभ होतं.
4 एका लाल कापड्यात दोन मूठ मसुराची डाळ बांधून मंगळवारी कोणा गरजूस दान करावं.
5 कुमारिका मुलींना मंगळाचा दोष असल्यास श्रीमद्भागवताच्या अठराव्या अध्यायाच्या नवव्या श्लोकजपात, तुळस रामायणाच्या सुंदराकडचे वाचन केले पाहिजे.
6 या दिवशी विवाहायोग्य जातकाला मातीच्या रिकाम्या भांड्याला वाहत्या पाण्यात सोडायला पाहिजे.
7 मुलीच्या कुंडलीत जर का आठव्या घरात मंगळ असल्यास पोळी करताना तव्यावर गार पाणी शिंपडून मग पोळ्या बनवाव्या.
8 लाल किताबानुसार जर का कुंडलीत मंगळदोष असल्यास लग्नाच्या वेळी घरात जमीन खणून त्यामध्ये तंदूर किंवा भट्टी लावू नये.
9 पूर्ण श्रावण महिन्यात किंवा उपवासाच्या दिवशी श्री मंगळागौरीचे मंत्र - ॐ गौरीशंकराय नमः चे शक्य असल्यास जास्त जप करावं.
10 लाल कापड्यात बडीशोप बांधून आपल्या झोपणाच्या खोलीत ठेवावे. असे केल्यास मंगळदोषात कमतरता येते.
हे उपाय केल्याने आयुष्यातील सर्व मार्ग सोपे होतात आणि जातकाच्या लग्नाचे योग लवकर जुळून येतात.