शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (08:25 IST)

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

mahadev
एकदा देवी पार्वतीने महादेवाला विचारले की, गृहस्थ जीवन जगत असलेल्यांचे कल्याण कसे होऊ शकतं? यावर महादेवाने सांगितले की ''अश्या गृहस्थावर सर्व देव आणि ऋषी आणि महर्षी प्रसन्न राहतात ज्यांच्यात हे गुण असतील... ''
1. सत्य बोलणे
2. सर्व प्राण्यांवर दया करणे
3.  मन आणि भावनांवर संयम ठेवणे
4.  सामर्थ्यानुसार सेवा-परोपकार करणे
5. आई- वडील आणि वृद्ध लोकांची सेवा करणे
6. नम्रता आणि सद्गुणाने संपन्न असणे
7. अतिथी सेवेसाठी तत्पर असणे
8. क्षमाशील असणे
9. धर्मपूर्वक कमावणे
10.  दुसर्‍यांच्या धन- संपत्तीवर लोभ न ठेवणे
11.  परस्त्रीला वासनाच्या दृष्टीने न पाहणे
12.  दुसर्‍यांची निंदा न करणे
13.  सगळ्यांप्रती मैत्री आणि दया भाव ठेवणे
14.  मधुर आणि सौम्य वाणी बोलणे
15. स्वेच्छाचारापासून दूर राहणे

असा आदर्श व्यक्ती सुखी गृहस्थ असतो.