नागपंचमीची गाणी : केला केर नी वारा गेली
सूर्व्याची कन्या राधिका बत्तीस लक्षणी देवंताउठली कोंब्या फटफटीं पेटविल्या चंदनवाती
केला केर नी वारा गेली बागाईच्या गोठ्यांआणलं गुळीभर शेंण केलं सडा सारवण घातली कणा रांगूयीळी घेतली तांब्या घागयीरघेतली मोत्या चुंबयीळ घेतली गजनी चोळी
घेतला पिवळा पितांबर राधिका नेसून निघायीलीगेली यमुनेच्या तिरीं उतरली तांब्या घागयीर
ठेवली मोत्या चुंबयीळ ठेवली गजनी चोळीठेवला पिवळा पिंताबर घातला गळ्याखाली हात
काढला नवलाखी हार ठेवला कलम रुक्षावरीराधानं आंगूळ बा केली कपाळीं कुंकू लावीयलं
सुर्व्या नमस्कार केली नेसली पिवळा पितांबरघातली गजनी चोळी घेतली मोत्या चुंबयीळ
घेतली तांब्या घागयीर लागली राजस मारगींआली घराजवयीळी वतली घागर घंगायीळी
लावली माळ्याला शिडी काढले चंदन सलपेपेटविल्या तांब्या चुली काढले साळी तांदूयीळ
घंगाळी आदणीं वैरीयीले मुगाचं वरण करीयलंकेली वाग्यांयाची शाक राधिकां सैपाक बा केला
वाढला सासूसासर्याला वाढला दीर जावयीलावाढला आपुल्या भर्ताराला वाढलं नणंदबाईला
केलं आपुलं बा ताट राधिका जेवाय बसयीलीराधेला अपसकून झाला पैला घास धरनीला
दुसर्या घास गळीं आला घातला गळ्याखालीं हातनाहीं नवलाखी हार राधा मनीं चरकली
गेली यमुनेच्या तिरीं बोलली कलम रुक्षायालामाजा नवलाखी हार कुठं गेला सांग दादा
कलमावरच गुरुयीड तो बा बोलूं लागयीलातुजा नवलाखी हार नेला गवळ्याच्या वाड्या
आरं तूं गवळ्या गोइंदा दे बा माजा हारनवलाखी हार दिल्यावर काय ग राधे देशील
दीन पांच सुपार्या दीन पांच नारयीळआमी मथुरेचे वानी आमां नारळसुपारीचं काय?...