गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

Shiva And Nandi नंदी हे भगवान शिवाचे द्वारपाल आहेत

Shiv nandi
Shiva and Nandi नंदी महादेवांचे वाहन आणि प्रथम द्वारपाल म्हणून ओळखले जातात. महादेव स्वतः निरंतर जप करत असतात आणि त्यांचे जप भंग होऊ नये त्यासाठी त्यांनी नंदींना स्वतःचा द्वारपाल म्हणून ठेवले आहे.
 
महादेवांनी अनेक 'गण' निर्माण केले होते त्यापैकी सर्वात प्रमुख नंदी आहे. कैलाश प्रवेशाचे द्वारपाल म्हणून रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. हे महादेवांचे संदेशवाहक म्हणून देखील ओळखले जातात. हेच कारण आहे की लोकं नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगतात आणि असं मानलं जातं की ते आपला संदेश महादेवांपर्यंत पोहचवतात.
 
पंडित जयप्रकाश तिवारी सांगतात की “एकेकाळी महादेवांनी सगळ्या देव गणांना बोलवलं. सगळे आले पण उत्तर दिशेचे आगमन झाले नाही तेव्हा उत्तर दिशेच्या स्थानावर नंदी ह्यांना बसवलं. आज सगळे लोकं पहिले त्यांना नमन करतात, त्यांचे कानामध्ये आपली मनोकामना म्हणतात. जे काही पण त्यांना महादेवांना सांगायचे असतं पण ते सांगू शकत नाही ते नंदीच्या कानात सांगतात आणि पटकन ती गोष्टी महादेवांपर्यंत पोहचते. कारण नंदी हे महादेवांचे 'प्रथम द्वारपाल' आहेत.”
 
'सद्गुरूंच्या अनुसार प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेरील नंदी हे प्रतीक्षा आणि सावधतेचे प्रतीक आहे.' नंदीच्या महादेवांवर लावलेले ध्यान आपल्याला हे शिकवतं की आपणही मंदिरात जाऊन सगळे विचार एका बाजू ठेवून सर्व लक्ष फक्त देवाकडे लावले पाहिजे.