1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. श्रीदेवी
Written By
Last Modified: शनिवार, 3 मार्च 2018 (15:11 IST)

जॅकलीन झाली 'ट्रोल'

श्रीदेवी यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले स्‍मशानभूमीत त्‍यांच्यावर अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले. यावेळी अंत्‍यसंस्‍काराआधी त्‍यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी  सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले होते. जॅकलीनही श्रीदेवींना श्रध्दांजली वाहण्यासाठी आली होती. मात्र, श्रीदेवी यांच्या निधनाचे दु:ख व्यक्‍त करण्याऐवजी ती हसत असल्‍याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. जॅकलीनच्या या कृत्‍यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली. 
 

'प्रिय जॅकलीन तुला जर एखाद्या मृतकाच्या प्रती आदर व्यक्‍त करता येत नसेल तर तू अशा ठिकाणी जायला नको पाहिजे,' एका युजरने म्‍हटले आहे. 'जॅकलीनला लाज वाटायला पाहिजे, किमान तू खोटी भूमिका तर करू शकली असतीस,' अशी मतेही सोशल मीडियावरून व्यक्‍त केली जात आहेत.