मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. शीख
  3. शीख धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (15:31 IST)

Guru Gobind Singh Jayanti गुरु गोविंदसिंग यांच्या 11 सूचना आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दर्शवतील

1. परदेसी, लोरवान, दु:खी, अपंग, मानुख दि यथाशक्त सेवा करनी :
कोणत्याही परदेशी माणूस, दु:खी व्यक्ती, अपंग आणि गरजू व्यक्तीची मदत करावी.
 
2. गुरुबानी कंठ करनी :
गुरुबानी कंठस्थ करावी.
 
3. धरम दी किरत करनी :
आपली जीविका ईमानदारीपूर्वक कार्य करत चालवावी.
 
4. कम करन विच दरीदार नहीं करना :
काम करताना खूप मेहनत करावी आणि कामाप्रती लापरवाही करु नये.
 
5. धन, जवानी, तै कुल जात दा अभिमान नै करना :
आपलं तारुण्य, जात आणि कुळधर्माविषयी गर्विष्ठ होऊ नये.
 
6. जगत-जूठ तंबाकू बिखिया दी तियाग करना :
कोणत्याही प्रकाराचे व्यसन, नशा करु नये.
 
7. किसी दि निंदा, चुगली, अतै इर्खा नै करना :
एखाद्याची फसवणूक आणि निंदा टाळा आणि एखाद्याचा हेवा करण्याऐवजी कठोर परिश्रम करा.
 
8. बचन करकै पालना :
आपल्या दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
 
9. दुश्मन नाल साम, दाम, भेद, आदिक उपाय वर्तने अते उपरांत युद्ध करना :
शत्रूचा सामना करण्यापूर्वी साम, दाम, दंड, भेद नीती अमलात आणावी नंतर आमोर-समोर युद्ध करावे.
 
10. शस्त्र विद्या अतै घोड़े दी सवारी दा अभ्यास करना :
स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी शारीरिक सौष्ठव, शस्त्र हाताळणे आणि घोडेस्वारीची तयारी करावी. हल्लीच्या संदर्भात नियमित व्यायाम करावा.
 
11. दसवंड देना :
आपल्या कमाईचा दहावा भाव दान करावा.