शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By

शेवगा सूप

साहित्य : 5-6 कोवळ शेवगच्या शेंगा, अर्धी वाटी शेवग्याची कोवळी पाने, 4.5 लसूण पाकळ्या, आलचा तुकडा, एक चमचा तांदूळपिठी, मीठ, दोन वाट्या गोड ताक.
 
कृती : आले, लसूण, कोथिंबीर एकत्र बारीक वाटावे. शेंगा सोलून तचे तुकडे करावेत. कोवळी पाने, शेंगा वेगवेगळे उकडून घवे. शेवगची पाने तांदूळ पिठी, ताक, मीठ, चिमूटभर साखर सर्व एकत्र करून मिक्सरमधून फिरवावे. एक चमचा तुपाची जिरे घालून फोडणी करावी. ताकात घालावी. शेंगा घालून सूप चांगले उकळावे. गरम सूप पौष्टिक असून चवदार लागते.