शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By

चिंचेच्या आमटीतील बेसन वडी

साहित्य : 2 वाट्या बेसन, 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, मीठ चवीनुसार, पाव चमचा हळद, 1- 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा धने व जिरे पूड. 
 
आमटी : अर्धी वाटी चिंचेचा कोळ, दाण्याची पूड पाव वाटी, काळा मसाला दीड चमचा. 1 लहान चमचा बेसन, थोडासा गूळ मोहनासाठी लहान चमचा तेल, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरचीचे तुकडे हिंग.
 
दोन वाट्या बेसन घेऊन त्यात चिरलेली कोथिंबीर, तेल, तिखट, मीठ, हळद, धने, जिरे पूड अर्धा चमचा घाला. थोडे पाणी घालून घट्ट भिजवून घ्या. गोळा बनवून पोळपाटावर मोठी पोळी लाटा, सुरीने चौकोनी तुकडे करून घ्या. 
 
कृती : कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कडीपत्ता, लालमिरची व हिंग घालून फोडणी करा. अर्धा चमचा आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट घालून हालवा, अर्धा चमचा धने पूड व जिरे पूड घाला.
 
चिंचेचा कोळात पाणी मिसळून दाण्याचा कूट व 1 चमचा बेसन घालून कालवून घ्या, पातळ करा. वरील फोडणीत कालवलेले चिंचेचे सारण, तिखट, मीठ, काळा मसाला व अंदाजे गूळ घाला. नंतर थोडे पाणी घालून उकळा व त्याच्या बेसनाच्या वड्या घाला, 5 मिनिटे उकळून द्या. चिंचेच्या आमटीतील आंबट, गोड, तिखट अशा बेसन वड्या तयार होतील.