शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

मॅक्सिकन भेळ

साहित्य : 1 कप मका आटा, 1/2 कप मैदा, 1 चमचा तेल, 1/2 चमचा मीठ, तेल.

इतर लागणारे साहित्य : 1 टोमॅटो, 1 मोठा कांदा, 1 उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर,1/4 कप हिरवी चटणी, चिंचेची चटणी स्वादानुसार, मीठ, तिखट व जिरे पूड.

कृती : टाको तयार करण्यासाठी मक्याच्या कणकेत मैदा आणि मीठ मिसळावे. यात तेल व आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून कणीक भिजवावी. या कणकेच्या गोळ्याला 1/2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये कापून तळून घ्यावे. कांदा, टोमॅटो, बटाटा बारीक चिरून घ्यावे. एका मोठ्या बाउलमध्ये टाकोला हाताने कु्स्करून त्यात टाकावे व बाकी उरलेले सर्व साहित्य घालून लगेचच सर्व्ह करावे. ही मॅक्सिकन भेळ खाण्यात फारच रुचकर लागते.