मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

इडली पिझ्झा

ND
इडलीसाठी साहित्य : 1 कप सोजी, 1/2 कप दही, चवीनुसार मीठ आणि 1 छोटा पॅकेट फ्रूट सॉल्ट.

सजावटीसाठी साहित्य : 1 मोठा कांदा चिरलेला, 1 मोठी सिमला मिरची बारीक चिरलेली, 1/2 कप कॉर्न उकळलेले, थोडंसं पनीर
किसलेला, 1/2 चमचा चिली फ्लेक्स, 2 मोठे चमचे टोमॅटो कॅचअप आणि 2 छोटे चमचे चिली गार्लिक सॉस.

कृती : सोजीत मीठ व दही घालून फेटून घ्यावे. इडली मेकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालून इडल्या तयार कराव्या. नंतर इडल्या गार झाल्यावर वरून सॉस लावून चिली फ्लेक्स, चिली सॉस, चिरलेल्या भाज्या, कॉर्न व पनीर टाकून सर्व्ह करावे.