गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

नूडल्स भेळ

ND
साहित्य : 1 मोठा बाऊल क्रिस्पी फ्राईड नूडल्स, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 उकळलेल्या बटाट्याच्या फोडी, 1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 चिरलेला टोमॅटो. खजूर चिंचेची आंबट-गोड चटणी व हिरवी चटणी.

कृती : सर्व प्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये क्रिस्पी फ्राईड नूडल्स घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी, थोडे भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली सिमला मिरची, टोमॅटोच्या फोडी घालून त्यावर आपण भेळेवर घालतो त्या दोन चटण्या (खजूर, चिंचेची आंबट-गोड चटणी व हिरवी मिरची, कोथिंबीर वाटून केलेली तिखट चटणी) घालणे. बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवणे.