मंगळवार, 11 मार्च 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

भरीव टोमॅटो

ND
ND
साहित्य : 1/2 कप दही, 5 टोमॅटो, 50 ग्रॅम पनीर आणि उकळलेले मटर, 2 चमचे टोस्टचा चुरा, 1 चमचा लोणी, 2 उकळलेले बटाटे, कापलेला कांदा, मीठ, मिरची, धने, हळद, हिरवी मिरची, धने, जिरे, गरम मसाला.

कृती : बटाट्यात पनीर, हिरवी मिरची, धने, उकळलेले मटर, टोस्टचा चुरा, लोणी, मीठ, मिरची चांगल्याप्रकारे मिसळून मळून घ्यावी. टोमॅटोंना पोकळ करून त्यात हा सर्व मसाला भरावा. कढईत तेल घालून जिरे, कापलेली मिरची, कांदा घालून लाल करून घ्यावे. त्यात टोमॅटोचा गोळा मिळवावा. त्यात दही टाकून भाजावे. आता भरलेले टोमॅटो त्यात घालून थोडेसे पाणी टाकून झाकण ठेवावे. गरम झाल्यावर कोथिंबीर, क्रीम, गरम मसाला टाकून सर्व्ह करावे.