शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. लेख
Written By वेबदुनिया|

बोल्टची जडणघडण आईच्या शब्दात

उसेन सेंट लिओ बोल्ट आणि विक्रम यांचे नाते आता सर्वपरिचित झाले आहे. त्याच्या अफाट वेगामुळे त्याला लाईटनिंग बोल्ट (विजेचा तडाखा) हा खिताब मिळाला आहे. वीजेच्या वेगाने पळणारा हा जमैकाचा 23 वर्षीय धावपट्टू 21 ऑगस्ट 1986 रोजी ट्रेलॉनी पॅरिश या छोट्याशा गावात जन्मला आहे. त्याच्या गावात सन 2008 पर्यंत पथदीवे, पिण्यासाठी पाणी, रस्ते या सुविधाही नव्हत्या. तरी तो घडला, कसा घडला हे त्याची आई जेनिफर हिच्या शब्दात...

ND
ND
उसेनला जगातील सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखतात. परंतु माझ्यासाठी तो माझा लाडका मुलगा आहे. त्याचे वडील वेलेस्लेमध्ये छोटे दुकान चालवितात. यामुळे लहानपणी त्याला स्पोर्ट्स शूजसुद्धा आम्ही विकत घेवून देवू शकलो नाही. शाळेने त्याच्या खेळातील प्रगती पाहून त्याला बुट दिले. त्यानंतर त्याचे प्रशिक्षण वेगाने सुरु झाले. त्याच्या जन्मगावी मागील वर्षापर्यत पथदिवेही नव्हते. पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळांवर तासनतास रांगा लावाव्या लागत होत्या. तेथील वयोवुद्ध व्यक्ती वाहन म्हणून गाढवाचा वापर करतात. या वातावरणात बोल्ट तयार झाला.

'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' या म्हणीचा प्रत्यय आला. उसेन तीन आठवड्यांचा होता तेव्हा मी त्याला अंथरुनावर झोपवून बाहेर गेली. जेव्हा मी परत आले तेव्हा तो अंथरुनावरुन खाली येवून गेला होता. त्यानंतर परत त्यावर चढण्याचा प्रयत्न करीत होता. तेव्हाच मला समजले हा मुलगा सर्वसाधरण नाही. तो असान्य कामगिरी करेल. यामुळे आम्ही त्याच्या आहाराकडे विशेष लक्ष देवू लागलो. त्याचा प्रवेश आम्ही विलियम निब हायस्कूलमध्ये घेतला. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापाकांनी त्याची खेळामधील प्रगतीने अचंबित झाले. त्यांनी त्याच्या प्रशिक्षणाची सोय केली. मग बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्याने विश्वविक्रम केल्यावर आमच्या गावात आणि त्याच्या शाळेत उत्सव सुरु झाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

बोल्टचे पदक
बीजिंग: 100 मीटर- सुवर्णपदक
बीजिंग: 200 मीटर- सुवर्णपदक
बीजिंग: चार बाय 100 रिले- सुवर्णपदक

जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धा 2009
100 मीटर - सुवर्णपदक (9.58 सेकंद)
200 मीटर - सुवर्णपदक (19.19 सेकंद)