1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

कतार ओपन टेनिस; राफेल नदाल विजेता

WD
जगात अव्वलस्थानी असलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने कतार ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याने फ्रान्सच्या गेल मोनफिल्स याचा पराभव केला. नदालने संघर्षपूर्ण लढतीत मोनफिल्सचा 6-1, 6-7(5-7), 6-2 पराभव केला. नदालचे हे त्याच्या कारकिर्दीतील 61 वे विजेतेपद ठरले. त्याने आंद्रे आगासीला मागे टाकले आहे. नदालने मोनफिल्सविरुध्द 9-2 असे यश मिळविले आहे. मोनफिल्सने दोहाचे 2009 आणि 2012 मध्ये विजेतेपद मिळविले होते.

त्यापूर्वी नदालने आश्चर्यकारीत पीटर गोझोविंझ याचा उपांत्य फेरीत 4-6, 6-2, 6-3 असा पराभव केला.

या स्पर्धेचे नदालने विजेतेपद मिळविले नाव्हते. यावेळी त्याने प्रथमच विजेतेपद मिळविले. मी कधीही स्पर्धा जिंकलेली नाही परंतु म ला ही स्पर्धा जिंकेन अशी आशा होती, असे नदालने सांगितले.