बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वार्ता|

ऑलंपिक 2008 च्या मशालीचे अनावरण

सन 2008 मध्ये चीनमध्ये होणार्‍या ऑलंपिकच्या मशालीचे अनावरण आज येथे ऑलंपिक परिषदेच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झाले.

मशालला 300 हुन जास्त नाव सुचवण्यात आली होती. त्यापैकी क्लाऊड ऑफ प्रॉमिस हे नाव देण्यात आले. मशालीला चिनी वास्तुकला पेंटिंग तसेच कथावाचनाच्या परंपरेचा अद्वितीय समन्वयक साधला आहे.

मशालला मार्च 2008 मध्ये यूनानच्या ऑलंपिक शहरामध्ये प्रज्वलित केली जाणार आहे. ही मशाल जगभरातील 20 देशांमध्ये यात्रा करणार आहे. यात भारतासह ब्रिटन, फ्रान्स अमेरिका ऑस्ट्रेलिया व जपानचा समावेश आहे. त्यानंतर मशाल चीनच्या 113 शहरांमध्ये यात्रा करणार आहे. व 8 ऑगस्ट 2008 मध्ये ती पेइचिंग येथे आपल्या जागेवर दाखल होईल.