नरसिंगची बंदी नाडाने उडविली
डोपिंगप्रकरणी नरसिंग यादव याच्यावर घालण्यात आलेली बंदी नाडाने उडविली आहे. डोपिंग विरोधी एजन्सी (नाडा) कडून कुस्तीपटू नरसिंग यादवला दिलासा मिळाला आहे.
रिओ ऑलिम्पिकपूर्वी डोपिंग टेस्टमध्ये यादव पकडला गेला होता. यात त्याचा काही दोष नसून त्याच्या ड्रिंक्समध्ये काही तरी भेसळ झाल्याचे सांगत नाडाने त्याला मोठा दिलासा दिला असून त्याच्यावर घालण्यात आलेली बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याला भाग घेता येऊ शकणार आहे.
25 जून आणि 5 जुलै रोजी झालेल्या तपासणीत नरसिंगच्या अ आणि ब नमुन्यांत मेटँडिएनोन या स्टेरॉईडचा अंश आढळून आला होता. नरसिंगनं मात्र त्याच्या खाण्यात काहीतरी मिसळण्यात आल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी नाडाच्या शिस्तपालन समितीसमोर नरसिंगची सुनावणी झाली. सुनावणीनंतर नाडानं नरसिंगची बाजू मान्य केली आहे.