गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रिओ , शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (16:08 IST)

माझं स्वप्न क्रूरपणे मोडलं : नरसिंग यादव

क्रीडा लवादानं नरसिंग यादववर चार वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळं नरसिंग यादव ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही.

नरसिंग म्हणाला की, ‘क्रीडा लवादच्या निर्णयानं मी पूर्णपणे कोलमडून गेलो आहे. मागील दोन महिन्यापासून मी बरंच काही सहन केलं. पण देशासाठी खेळायचं या एकाच ध्येयानं मी तग धरुन होतो. पण माझ्या पहिल्या बाउटआधी अवघ्या 12 तासांपूर्वी देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं माझं स्वप्न क्रूरपणे मोडलं.

उत्तेजक सेवनप्रकरणी नरसिंगला नॅशलन अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं क्लीनचिट दिली होती. पण नाडाच्या या निर्णयाचा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडानं विरोध केला. वाडानं नाडाच्या त्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे अपील केलं होतं. अखेर चार तासांच्या चर्चेनंतर क्रीडा लवादानं नरसिंगला चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली.