बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

विजय कुमार विषयी रोचक माहिती

WD
WD
हिमाचल प्रदेशातील हमीरपुरचा रहिवाशी विजय कुमार भारतीय लष्कराच्या मार्क्समॅन यूनिटमध्ये सुबेदार आहे. सद्या तो मध्यप्रदेशातील महू येथे पदस्थ आहे.

विजय कुमारला सुवर्ण पदकाने फक्त ४ अंकांनी हुलकावणी दिली. विश्व विक्रमाची बरोबरी करताना क्यूबाच्या लॉरिस पूर्प ने सुवर्णावर नांव कोरले. पूपो ने ३४ तर विजय कुमारने ३० अंक नोंदवले. चीनच्या डिंग फँग ने २७ अंक नोंदवत कांस्य जिंकले.

याअगोदर २०१० मध्ये राष्ट्रकूल स्पर्धेत विजय कुमारने ३ सुवर्ण तर १ रौप्यपदक पटकावले होते. त्याने २००९ मध्ये बीजिंग येथे झालेल्या आयएसएसएफ वर्ल्ड शूटिंग करंडकात रहत पदकावर निशाना साधला होता.

दमदार कामगिरीसाठी त्याला २००७ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २००७ मधील आशियाई खेळात त्याने २५ मीटर सेंटर फायर मध्ये रजत पटकावले होते.

याअगोदरही विजयने २००६ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत २ सुवर्ण जिंकून नेमबाजीतील अभियानाची स्वर्णिम सुरूवात केली होती.

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी लंडन ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी विजय कुमारचा 'हिमाचल गौरव' पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असल्याचे जाहिर केले. क्रिडामंत्री अजय माकन यांनी विजयचे अभिनंदन केले आहे. (वेबदुनिया न्यूज)