1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

'टि्वटर, फेसबुक'वर उद्‍घाटन सोहळा लीक

WD
ऑस्कर विजेते चित्रपट दिग्दर्शक डॅनी बॉयल आणि त्यांची चमू ऑलिम्पिक उद्‍घाटन सोहळ्याबाबत पूर्णपणे गुप्तता राखण्याचा प्रयत्न करीत असली तरी, या सोहळ्याच्या रंगीत तालिमीदरम्यान उपस्थित राहणार्‍या प्रेक्षकांनी त्यांच्या योजना 'ट्विटर' आणि 'फेसबुक'च्यामाद्यमातून उडघ केल्या आहेत.

प्रेक्षकांच्या या कृत्यामुळे त्रस्त झालेले बॉयल यांनी सोमवारी रंगीत तालीम पाहण्यास आलेल्या 30 हजार प्रेक्षकांना याबाबची छायाचित्रे आणि इतर साहित्यांबाबत सामाजिक संकेतस्थळावर माहिती न टाकण्याचे आवाहनही केले तरी, मंगळवारी उद्‍घाटान सोहळ्याबाबतची माहिती सामाजिक संकेतस्थळांवर आढळून आली.