मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 7 एप्रिल 2021 (15:10 IST)

आशियाई बॉक्सिंग चॅम्पिनशीप : मेरी कोमकडे भारताचे नेतृत्व

Asian Boxing Championship
एम. सी. मेरी कोम पुढील महिन्यात होणार्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पिनशीपमध्ये भारताचे नेतृत्व करेल. दिल्लीच्या इंदिरा गांधी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्सकमध्ये होणारी ही स्पर्धा 21 ते 31 मे पर्यंत चालणार आहे. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने नॉन ऑलिम्पिक वजनी गटाच्या मागील आठवड्यात राष्ट्रीय ट्रायल्स घेतल्या होत्या. 
 
त्यामध्ये मेरी कोमशिवाय सिरनजीत कौर (60 किग्रॅ), लोविना बोरगोहेन (69 किग्रॅ) व पूजा राणी (75 किग्रॅ) या तीन मुष्टियोध्दा महिलांनी भाग घेतला नव्हता. मात्र या तिघीही टुर्नामेंट खेळणार आहेत.