फिफा विश्‍वचषक स्पर्धा; पराभवामुळे विरला पहिल्या गोलचा आनंद

नवी दिल्ली|
कोलंबियासारख्या कसलेल्या संघाविरुद्ध किमान दोन वेळा भारताला विजयी गोल करण्याची संधी मिळाली होती. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या 46 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाने जीकसन सिंगच्या ऐतिहासिक गोलमुळे 1-1 अशी बरोबरीही साधली होती. परंतु युआन पेनॅलोझाने पुढच्याच मिनिटाला दुसरा गोल नोंदविताना कोलंबियाचा विजय निश्‍चित केला.
अर्थात 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील या पराभवानंतरही भारतीय संघाची मान ताठ होती. त्यातही जीकसन सिंगने फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील भारताचा पहिलावहिला गोल नोंदविल्यामुळे त्याच्यावर प्रकाशझोत होताच. परंतु भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे ऐतिहासिक गोल करण्याचा आनंद विरला, अशी कबुली जीकसनने सामन्यानंतर दिली.

आमची या सामन्यात विजय मिळविण्याची क्षमता होती आणि पात्रताही. परंतु नशिबाने साथ न दिल्यामुळे आमचा विजय हुकला, असे सांगून जीकसन म्हणाला की, भारताने विजय मिळविला असता, तरच माझ्या गोलला अर्थ होता. अर्थात या पराभवातून आम्हाला मोठा धडा मिळाला आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण करताना असे धडे आवश्‍यकच असतात. आम्ही यातून शिकून आमच्यात निश्‍चितच सुधारणा घडवून आणू.
मणिपूरमधील हावखा ममांग या खेड्यातील जीकसन हा रहिवासी. त्याच्या वडिलांना दोन वर्षांपूर्वी हृदयविकारामुळे मणिपूर पोलीस दलातील नोकरी सोडावी लागली. त्यानंतर आईने भाजीपाला विकून मिळविलेल्या तुटपुंज्या कमाईवर त्याच्या कुटुंबाची गुजराण होत होती. दरम्यान जीकसनला दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय निवड समितीने पसंती दिली नाही. परंतु या धक्‍क्‍यातून सावरून त्याने फिफा 17 वर्षांखालील भारतीय संघात स्थान मिळविण्यापर्यंत मजल मारलीच.
आता वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याचे जीकसनचे स्वप्न आहे. काही झाले तरी फिफा विश्‍वचषक स्पर्धेत भारताचा पहिलावहिला गोल नोंदविणारा खेळाडू म्हणून इतिहासात त्याचे नाव अजरामर झाले आहेच.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो प्रवाशांच्या संपर्कात
बारामतीमध्ये एका रिक्षाचालकाला करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. सर्दी, ताप, खोकला ...

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच केला आहे. चार रंगात ...

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य
कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन
कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व ...

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी ...