पीव्ही सिंधूने हिलो ओपनचे विजेतेपद पटकावून दुसरी चॅम्पियन बनत पुन्हा एकदा भारताचा झेंडा उंचावला
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने हिलो ओपन सुपर ५०० चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात तिने डेन्मार्कच्या लाईन होजमार्क केअरफेल्डचा २१-१२, २१-१४ असा पराभव केला.
दोन वेळेस ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवत भारतीय बॅडमिंटन चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूने १ नोव्हेंबर रोजी हिलो ओपन सुपर ५०० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात तिने डेन्मार्कच्या लाईन होजमार्क केअरफेल्डचा सरळ गेममध्ये पराभव करत या हंगामातील आपली दुसरी ट्रॉफी जिंकली. तिने जुलैमध्ये जपान ओपनचे विजेतेपदही पटकावले होते.
माजी विश्वविजेती सिंधूने अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या प्रतिस्पर्ध्यावर दबाव कायम ठेवला होता. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय खेळाडूने ३९ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत २५व्या क्रमांकावर असलेल्या डॅनिश खेळाडूला २१-१२, २१-१४ असे पराभूत केले. स्पर्धेत दुसरे मानांकन मिळालेल्या सिंधूने तिच्या उत्कृष्ट स्ट्रोक-प्ले, कोर्टवरील नियंत्रण आणि उत्कृष्ट नेट गेमच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवला.
या विजयामुळे सिंधूने ९,२०० रँकिंग गुणही मिळवले आहे. यामुळे हंगामाच्या अखेरीस होणाऱ्या BWF वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्र ठरण्याच्या तिच्या आशा बळकट झाल्या आहे.

