बाप्परे, मेरी कोमने चार तासांचा दोन किलो वजन कमी केले
पोलंडच्या गिलवाइसमध्ये झालेल्या १३ व्या सिलिसियन बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम जेव्हा तेथे पोहचली तेव्हा तिचे वजन दोन किलोने जास्त होते. तसेच तिच्याकडे चार तासांचा वेळ होता. तिने हे आव्हान पूर्ण केले आणि सोबतच स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी सुवर्ण पदकाची कमाई केली.
पाच वेळची विश्व चॅम्पियन मेरी कोम म्हणाली की, ‘आम्ही सकाळी तीनच्या सुमारास तेथे पोहचलो. वजन मोजण्यास साडेसात वाजता सुरुवात होणार होती. मला ४८ किलो गटात खेळायचे होते. आणि माझे वजन दोन किलोने जास्त होते. माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी चार तास जास्त होते. अन्यथा मी अपात्र ठरले असते. त्यामुळे मी सलग एक तास दोरी वरच्या उड्या मारल्या. त्यानंतर वजन कमी करण्यास सुरुवात केली असे सांगितले.