रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

मिलिंद सोमणने पार केले 517 किमी अंतर

फ्लोरिडा- भारतीय अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमणने सातसमुद्रापलीकडेही तिरंगा फडकावला आहे. 51 वर्षीय मिलिंदने तीन दिवसांत 517 किमी अंतराची मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली आहे. फ्लोरिडा येथे झालेली ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण मॅरेथॉन स्पर्धा समजली जाते.
 
यात पोहणे, धावणे, सायकलिंग असे तीन टप्पे स्पर्धकांना पार करावे लागतात. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओरलँडोमध्येही ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला अल्ट्रामॅन स्पर्धा असेही म्हटले जाते. तीन दिवस चालणार्‍या या अल्ट्रामॅन स्पर्धेत पहिल्या दिवशी 10 किमी पोहणे आणि 142 किमी सायकलिंग करणे, दुसर्‍या दिवशी 276 किमी सायकलिंग तर तिसर्‍या दिवशी 84 किमी धावणे लागते.