मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2023 (18:52 IST)

द बुडल्स येथे टेनिस स्टार मेळा, नीता अंबानी यांनी पहिला रिलायन्स फाऊंडेशन ESA कप सादर केला

neeta ambani
जगातील टॉप 20 पुरुष टेनिसपटूंपैकी सात द बूडल्स टेनिसमध्ये खेळतात.
भारताबाहेर रिलायन्स फाऊंडेशनद्वारे समर्थित 'सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा'साठी हा पहिला पुरस्कार आहे.
कोविड महामारीनंतर या वर्षी बूडल्स परत आले आहेत.
स्टोक पार्क/मुंबई: रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी स्टोक पार्क, बकिंगहॅमशायर येथे बुडल्स टेनिस स्पर्धेत दिएगो श्वार्टझमन यांना रिलायन्स फाउंडेशन ईएसए कप प्रदान केला. विम्बल्डन चॅम्पियनशिपपूर्वी बुडल्स टेनिस स्पर्धा ही एक उत्तम सराव टेनिस स्पर्धा मानली जाते. स्टोक पार्क येथे खेळल्या गेलेल्या टेनिस स्पर्धेचा 19 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. 27 जून ते 1 जुलै 2023 दरम्यान खेळला जाईल. रिलायन्स फाऊंडेशन ESA कप बक्षिसे 5 दिवस चालणाऱ्या टेनिस स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी दिली जातील.
 
टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, रिलायन्स फाऊंडेशनच्या नीता अंबानी यांनी विजेते डिएगो श्वार्टझमनला पहिला रिलायन्स फाऊंडेशन ईएसए चषक प्रदान केला. त्यांनी यूकेच्या बकिंगहॅमशायर येथील Action4Youth ला निधी देखील दिली. Action4Youth आजचा विजेता डिएगो श्वार्टझमनच्या हृदयाच्या जवळ आहे.
 
यावेळी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, “येथील वातावरण अप्रतिम आहे. आम्हाला काही उत्कृष्ट टेनिस पाहायला मिळाले. खेळासोबतच धर्मादाय सेवा करण्याच्या संधीमुळे ते आणखी अर्थपूर्ण झाले आहे. मी सर्व तरुणांना शुभेच्छा देते आणि आशा करते की त्यांनी त्यांच्या आवडीचा कोणताही खेळ घ्यावा आणि त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन आणावा."
 
बूडल्स 2023 हा टेनिस सुपरस्टारचा उत्सव आहे. जगातील अव्वल 20 पुरुष टेनिसपटूंपैकी सात यावर्षी द बूडल्स टेनिसमध्ये खेळत आहेत, ज्यात टेनिस स्टार स्टेफानोस त्सित्सिपास (जागतिक क्रमांक 5), होल्गर रून (जागतिक क्रमांक 6) आणि आंद्रे रुबलेव्ह (जागतिक क्रमांक 7) यांचा समावेश आहे. साथीच्या रोगानंतर टेनिस पुन्हा द बूडल्सच्या मैदानावर आले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर होणाऱ्या या स्पर्धेबाबत टेनिस रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
 
भारताच्या क्रीडा नेत्या नीता अंबानी या थेट विविध खेळांशी संबंधित आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. ज्यांनी भारतातील क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच ऑलिम्पिक खेळांमधील विविध ऍथलेटिक्स संघटना आणि विविध क्रीडापटूंना पाठिंबा देऊन भारतातील ऑलिम्पिक चळवळ पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
Edited by : Smita Joshi