रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सिंधूचा नियुक्तीचा मार्ग मोकळा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिचा आंध्रपद्रेश सरकारमध्ये अ वर्ग पदावर नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सिंधूची सरकारी अधिकारी पदावर थेट नियुक्ती व्हावी याकरता, आंध्रप्रदेश विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आवश्यक विधयेक एकमताने मंजूर केले आहे. त्यामुळे येत्या काळात सिंधू ही अ वर्ग अधिकारी म्हणून सर्वांना परिचित होणार आहे.
 
आतापर्यंत आंध्रप्रदेश लोकसेवा आयोग कायद्यानुसार केवळ राज्य लोकसेवा आयोग, निवड समिती किंवा एम्प्लॉयमेन्ट एक्स्जेंचद्वारेच सरकारी सेवेत अधिकारी, कर्मचार्‍याची नियुक्ती होत असे.