शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2017 (09:31 IST)

सिंधूने इंडिया ओपन वर्ल्ड सुपर सीरिज जिंकली

भारताच्या पी. व्ही. सिंधूनं इंडिया ओपन वर्ल्ड सुपर सीरिजचं विजेतेपद पटकावलं आहे. ऑलिम्पिक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरिनचा कडवा संघर्ष मोडित काढून तिने हा विजय मिळवला. सिंधूने पहिल्यांदाच इंडिया ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.21-19, 21-16 अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव करुन इंडिया ओपन महिला एकेरीचं विजेतेपद सिंधूने पटकावलं. तिनं हा सामना अवघ्या 47 मिनिटांमध्ये जिंकला.
 
रिओ ऑलिम्पिकच्या फायनलनंतर सिंधू आणि कॅरोलिना तिसऱ्यांदा आमनेसामने आल्या होत्या. त्यात सिंधूनं मिळवलेला हा दुसरा विजय ठरला. त्यामुळे सिंधू आणि कॅरोलिना मरिन या दोघींमधल्या एकमेकींविरुद्धच्या विजयांचं समीकरण आता 4-5 असं झालं आहे.