शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शुक्रवार, 4 जून 2021 (17:16 IST)

सानियाचा विम्बल्डनमध्ये खेळण्याचा मार्ग सुकर

भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा महिला मुलगा इझान आणि बहीण अनाम यांच्यासह ब्रिटनला जाण्यासाठी व्हिसा मंजूर झाला आहे. त्यामुळे विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळण्याचा सानियाचा मार्ग सुकर झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, क्रीडा मंत्रालय तसेच लंडन आणि संयुक्त अरब अमिरातमधील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे सानियाला टोक्यो ऑलिम्पिकच्या  तयारीसाठी लंडनमधील काही स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.