चहा विक्रेत्याची मुलगी बनली आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टर विजेती
कुरुंदवाड : मनात जिद्द असली की अवकाशात भरारी मारता येते. मग कितीही अडथळे येऊ देत यशापर्यंत पोहचाचं असा ठाम निश्चय करून कुरुंदवाड येथील तेरवाड गावची कन्या निकिता सुनील कमलाकर हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोप्य पदक पटकावलं.घरची परिस्थिती बेताची. वडिल एका पायाने अपंग आहेत. कुटुंबाचं पोषण करण्यासाठी त्यांनी गावातच चहाचा गाडा टाकलायं. आपल्या मुलीने खेळात प्राविण्य मिळवावं अस ठरवून त्य़ांनी निकिताला वेटलिफ्टिंग स्पर्धेत उतरवलं. तिला तिच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. याच जोरावर तिने उझबेकीस्थान ताश्कंद येथे आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोप्य पदक पटकावलं. निकिताचे देशभरासह सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
उझबेकिस्तान येथील तारकंद येथे आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धा सुरु आहेत. यामध्ये ५५किलो वजनी गटात निक्कीताने ६८ किलो स्नॅक आणि ९५ किलो क्लिन ॲण्ड जर्क असे एकूण १६३ किलो वजन उचलून रौप्यपदक प्राप्त केले तर क्लीन ॲण्ड जर्कमध्ये सुवर्ण पदक पटकाविले. एक महिन्यापूर्वी मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत निकिताने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र त्यावेळी पदक हुकले होते. तिला विश्वविजय जीमचे प्रशिक्षक विजय माळी, विश्वनाथ माळी, निशांत पोवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकिताच्या या यशाबद्दल कुरूंदवाड व परिसरातून कौतुक होत आहे.