बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गोल्ड कोस्ट , शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (09:28 IST)

CWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले सिल्वर

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी सावंतने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये सुवर्णपदक पटकावले. तर भारताच्याच अंजुम मोदगिलने रौप्य पदकाची कमाई केली.
 
457.9 गुणांची कमाई करत तेजस्विनीने नवीन गेम रेकॉर्ड नोंदवला. भारताची नेमबाज अंजुम मोदगिलनेही 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये रौप्यपदकाची कमाई केली. अंजुमने 455.7 गुण पटकावले. तिसऱ्या स्थानावर स्कॉटलंडची नेमबाज होती.