शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गोल्ड कोस्ट , बुधवार, 11 एप्रिल 2018 (12:16 IST)

राष्ट्रकुल स्पर्धा: श्रेयसी सिंगची डबलट्रॅप नेमबाजीत सुवर्ण कामगिरी

भारतीय नेमबाजांनी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची लयलूट चालूच ठेवली असून नेमबाज श्रेयसी सिंगने महिलांच्या डबलट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. आजच्या दिवसातील हे दुसरे पदक असून याआधी ओम मिथरवालने कांस्यपदक मिळवले आहे. यामुळे भारताच्या नावावर आतापर्यंत १२ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्य पदकांची कमाई झाली आहे.
 
डबल ट्रॅप प्रकारात श्रेयसीने ऑस्ट्रेलियाच्या इमा कॉक्सला मागे टाकत सुवर्णपदक आपल्या नावे केले. व इमाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिसऱ्या स्थानावर स्कॉटलंडच्या लिंडा पिअर्सन आहे.
 
दरम्यान बॉक्सिंगमध्ये मेरी कोमनेही भारतासाठी एक पदक निश्चित केले आहे. ४५-४८ किलो वजनी गटात मेरी कोमने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे.