शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गोल्ड कोस्ट , गुरूवार, 12 एप्रिल 2018 (11:56 IST)

राष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक

तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर रायफल प्रकारात ६१८.९ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावले आहे. सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे वेलोसोनं ६२१ गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
 
सध्या भारत २४ पदकांसह पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे कुस्ती आणि नेमबाजीतून भारताला आणखी सुवर्णपदकं मिळाल्यास भारताचं पदकतालिकेतलं स्थान सुधारण्याची शक्यता आहे.