गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 6 जुलै 2021 (16:24 IST)

या आशियाई देशाचं तिरंदाजीत वर्चस्व, काय भारत ऑलिम्पिकमधील वर्ल्ड कपच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकेल?

तिरंदाजीला ऑलम्पिकच्या खेळात परत जाण्यासाठी तब्बल 52 वर्ष प्रतीक्षा करावी लागली होती.गेल्या 33 वर्ष पासून भारत देखील यात आपले नशीब अजमावत आहे.पण वर्ल्डकपमध्ये चमकणारे अनेक धनुर्धारींनी खेळांच्या हंगामात अपेक्षेप्रमाणे कारकिर्दी केली नाही.
 
टोकियो ऑलम्पिक मध्ये देखील भारतातील चार तिरंदाज आपले आव्हान सादर करतील.या मध्ये पॅरिसमध्ये तीन विश्वचषक सुवर्णपदक विजेती दीपिका कुमारी यांचा समावेश आहे, जी  आतापर्यंत या खेळांमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे.भारतातील एकूण 21 तिरंदाजानी या मध्ये 13 पुरुष आणि 8 महिला 1988 पासून 2016 पर्यंत ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 
 
तिरंदाजी हा केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात जुन्या खेळांपैकी एक मानला जातो.1900 मध्ये ऑलिम्पिक मध्ये देखील या खेळाचा समावेश होता. यानंतर, तिरंदाजी हा 1904,1908 आणि 1920 मध्ये ऑलिम्पिक खेळांचा भाग होता पण त्यानंतर तो खेळातून वगळला गेला.
 
1972 च्या म्युनिख ऑलिम्पिक मध्ये  52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये एकेरी स्पर्धेतून   तिरंदाजी परतली. नंतर यामध्ये दुहेरी आणि संघाच्या स्पर्धा जोडल्या गेल्या.1988 मध्ये सियोल ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने प्रथम तिरंदाजीत भाग घेतला होता आणि त्यानंतर भारतीय तिरंदाजांनी सिडनी ऑलिम्पिक (2000) वगळता प्रत्येक खेळात प्रतिनिधित्व केले होते.
 
ऑलिंपिक खेळात भाग घेणार्‍या प्रथम भारतीय तिरंदाजांपैकी लिंबा राम, संजीव सिंह आणि श्याम लाल हे होते. लिंबा रामने बार्सिलोना ऑलिम्पिक 1992 आणि अटलांटा ऑलिम्पिक 1996 मध्येही भाग घेतला होता. बार्सिलोनामधील कांस्यपदकासाठी ते केवळ एका गुणाने हुकले.
 
 
अथेन्स ऑलिम्पिक 2004 मध्ये प्रथमच तीन भारतीय महिला तिरंदाज डोला बॅनर्जी, रीना कुमारी आणि सुमंगला शर्मा यांनी भाग घेतला.2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये मंगल सिंग चंपियाने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. अतनू दासने रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत दीपिका कुमारी व लैशराम बोम्बायला देवी नवव्या स्थानावर राहिल्या.
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या दीपिका एकमेव महिला तिरंदाज असतील. हे त्यांचे तिसरे ऑलिम्पिक असेल. मागील दोन ऑलिम्पिक खेळांप्रमाणेच त्याही एकदम जोशात टोकियो जाणार. दीपिकाने नुकतेच वर्ल्ड कपच्या तिसर्‍या चरणात वैयक्तिक रिकर्व्ह, डबल्स आणि टीम स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली होती.
 
दीपिकाशिवाय भारताचे तीन पुरुष रिकर्व्ह तिरंदाज तरुणदीप राय, अतनू दास आणि प्रवीण जाधव हे देखील आव्हान देतील.
 
दक्षिण कोरियाने आत्तापर्यंत ऑलिम्पिक तिरंदाजीवर वर्चस्व राखले असून पुन्हा खेळामध्ये अव्वल स्थान मिळविण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण कोरियाने आता ऑलिम्पिक तिरंदाजीमध्ये एकूण 23 सुवर्ण पदकांसह एकूण 39 पदके जिंकली आहेत. त्यापाठोपाठ अमेरिका (14 सुवर्ण) व बेल्जियम (11 सुवर्ण) आहेत. बेल्जियमने 1900 ते 1920 दरम्यानची सर्व पदके जिंकली.