मारियाने भारतीयांवरील प्रेमापोटी काढला होता 'तो' टॅटू

maria sharapova
लंडन| Last Modified शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (15:34 IST)
पाच वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणार्‍या रशियाच्या टेनिसपटू मारिया शारापोव्हाने नुकतीच निवृत्ती स्वीकारली. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी मारिाने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाची अनेकांना कल्पना नव्हती. त्यामुळे या निर्णयानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला. तिच्या कारकिर्दीत तिने विविध विक्रमांना गवसणी घातली. त्याशिवाय ती एक ग्लॅमरस आणि सौंदर्यवती टेनिसस्टार म्हणून देखील चर्चेत राहिली. ती खेळत होती त्यावेळी तसेच आता निवृत्तीनंतर तिच्या विषीच्या खास गोष्टी जगासमोर येत आहेत. अशीच एक गोष्ट भारतीय लोकांशी निगडित असून मारिया शारापोव्हाचे भारतीयांवर आणि भारतीय भाषांवर विशेष प्रेम होते. त्यामुळेच तिने स्वतःच्या मानेवर हिंदीमध्ये 'जीत' या शब्दाचा टॅटू काढून घेतला होता. ही विशेष बाब समोर आली आहे.
शारापोव्हाचा जन्म 26 एप्रिल 1987 साली सर्बिया येथे झाला. तिने रशियात चार वर्षांची असताना टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती. 3 वर्षांनंतर 1994 मध्ये तिचे कुटुंब अमेरिकेत आले. त्यामुळे अमेरिकेत तिने टेनिसचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले. 2002 साली मारियाने ऑस्ट्रेलियन ओपन ज्युनिअर स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती सर्वात तरुण टेनिसपटू ठरली होती. तिने 2004 साली 17 वर्षांची असताना विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत आपले पहिले ग्रँडस्लॅम
पटकाविले. त्या सामन्यात तिने अव्वल मानांकित सेरेना विलियम्स हिला पराभूत केले होते. 2004 ला तिने वुमेन्स टेनिस असोसिएशनच्या टॉप 10 मध्ये प्रवेश केला होता. 2006 साली वयाच्या 19 व्या वर्षी तिने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली. 2008 साली तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली तर 2012 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याने तिने विजेतेपदाचा स्लॅम पूर्ण केला. असा पराक्रम करणारी ती 10 वी महिला टेनिसपटू होती. 2013 साली सलग 9 वर्षे सर्वाधिक कमाई करणार्‍या महिला खेळाडूंच्या 'फोर्ब्स'च्या यादीत शारापोव्हाला अव्वल स्थान मिळाले होते.
मारियाचे सुमारे दोन वर्ष अलेक्झांडर गिलकेस यांच्याशी अफेअर होते. 40 वर्षीय गिलकेस लंडनमधील उद्योगपती आहेत. तसेच ते 'पॅडल 8'चे संस्थापक अध्यक्ष आहेत. 'पॅडल 8' ही ऑनलाइन बोली लावणारी वेबसाइट आहे. 2016 साली मारिया उत्तेजक द्रव्यसेवन प्रकरणी दोषी आढळली. त्यामुळे तिच्यावर 2 वर्षांची बंदी घालणत आली होती. पण नंतर ही बंदी कमी करून 15 महिन्यांवर आणण्यात आली होती. डोपिंग प्रकरणी दोषी आढळल्यामुळे तिचे सुमारे 165 कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. नाइक, पोर्से, सॅमसंग यासारख्या नामांकित ब्रँडनी तिला दिलेले प्रायोजकत्व काढून घेतले. त्याचा मोठा फटका तिला बसला. 2017 साली तिने बंदीची शिक्षा संपल्यावर टेनिसमध्ये पुनरागन केले. पण त्यानंतर तिला कारकिर्दीत फारशी चमक दाखवता आली नाही.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

चिंताजनक, राज्यात ३१ जिल्ह्यात सरासरी ४.२ लोकांनाच शोधले ...

चिंताजनक, राज्यात ३१ जिल्ह्यात सरासरी ४.२ लोकांनाच शोधले गेले
एका कोरोना रुग्णामागे संपर्कातील किमान २० लोकांना शोधण्याच्या आदेशाचे राज्यातील कोणत्याही ...

ट्रॅफिक हवालदाराला बेदम मारहाण, या बाईवर तात्काळ कारवाई ...

ट्रॅफिक हवालदाराला बेदम मारहाण, या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी
मुंबईत एका ट्रॅफिक हवालदाराला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपूर्णपणे ...

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा
यंदा कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपूर्णपणे वेगळ्या ...

हाथरस पुन्हा एकदा हादरले : 4 वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन ...

हाथरस पुन्हा एकदा हादरले : 4 वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन मुलांनी केला बलात्कार
हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली ...

Jio Phone कडून उत्तम भेट! आता क्रिकेटशी संबंधित प्रत्येक ...

Jio Phone कडून उत्तम भेट! आता क्रिकेटशी संबंधित प्रत्येक अपडेट तसेच हजारो बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध होईल
रिलायन्स जिओने आपल्या जिओ फोन वापरकर्त्यांसाठी क्रिकेटशी संबंधित एक खास अ‍ॅप बाजारात आणला ...