सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्री स्वामी समर्थ
Written By
Last Updated : बुधवार, 10 एप्रिल 2024 (15:08 IST)

Shri Swami Samarth : श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतली का ?

श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार मानले आहे.श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामींनी श्रीक्षेत्र त्रयम्बकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली. तत्पश्चात स्वामी पंढरपूर, मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले.  मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःख मुक्त केले. श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराजांना स्वामींनी दीक्षा दिली आहे. 

स्वामींनी अनेकांना मार्गदर्शन करून त्यांनी अक्कलकोट मध्ये महासमाधी घेतली.त्यांना रविवार 30 एप्रिल 1878 रोजी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 अक्कलकोट येथे 'वटवृक्ष खाली माध्यान्हकाळी महासमाधी घेतली.  चोळप्पांनी स्वामींच्या समाधीची जागा ठरवून समाधी बांधून घेतली. चोळप्पा यात आधी तुला घालीन नंतर मी जाईन असे स्वामी चोळप्पाला म्हणायचे.आणि स्वामींच्या समाधिस्त होण्याच्या सहा महिन्यापूर्वी चोळप्पा यांचे निर्वाण झाले. नंतर त्यांचे शिष्य चोळप्पा यांच्या घराजवळ स्वामींना समाधिस्थ केले. जरी त्यांनी महासमाधी घेतली तरी ही  त्यांचे मंत्र "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणत त्यांचा आशीर्वाद भक्तांच्या पाठीशी आहे.   

 Edited By - Priya Dixit