शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (11:33 IST)

नवजात मुलांचे या प्रकारे बनवा Aadhaar, जाणून घ्या प्रक्रिया

आधार कार्ड महत्त्वाचे असून पॅन कार्ड, बँक खाते, मोबाइल नंबर याशी जोडणे अनिवार्य असल्याचे सांगितले जाते. आता तर शाळेत दाखल होण्यासाठी देखील आधार नंबर आवश्यक असल्याचे बघायला मिळत आहे. अशात लहानांचे आधार कार्ड बनवणे देखील आवश्यक झाले आहे. जर आपण देखील आपल्या चिमुकल्यांचे आधार बनवले नसेल तर अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. तर जाणून घ्या मुलांचा आधार कार्ड बनविण्यामागील फायदे आणि यासाठी लागणारे कागदपत्रं... 
 
यूआयडीएआय ने देशात जन्म घेणार्‍या नवजात मुलांसाठी आधाराची सुविधा प्रदान केली आहे. अर्थात आता आपण न्यू बोर्न बेबीचे देखील आधार कार्ड तयार करु शकता. काही हॉस्पिटलमध्ये जन्म झाल्यावर मुलांच्या आधार बनविण्याची प्रक्रिया सुरु केली जाते. अशात आपण देखील एक दिवसाच्या बाळाचा आधार बनवू शकता. 
 
यूआयडीएआयने ट्वीटमध्ये लिहिले आहे की प्रत्येकाने आधारासाठी इनरोल करावे. यासाठी नवजात मुलांचे नामांकन देखील केले जाऊ शकतं. यासाठी आपल्याकडे केवळ बाळाचं जन्म प्रमाणपत्र आणि आई-वडीलांपैकी एकाचे आधार नंबर असणे आवश्यक आहे. एक दिवसापासून ते 5 वर्षाच्या वयापर्यंत मुलांच्या आधारासाठी बायोमेट्रिक डेटा घेतला जात नाही. कारण 5 वर्षांपर्यंत मुलांचे बायोमेट्रिक यात परिवर्तन होत असतं. मुलांचे वय 15 वर्ष झाल्यावर शेवटी त्यांचे बायोमीट्रिक डेटा रेकॉर्ड केलं जातं.
 
आवश्यक डॉक्युमेंट्स
एक दिवसाच्या मुलांचे आधार बनविण्यासाठी आपल्याला केवळ मुलांच्या जन्म प्रमाणपत्र आणि आई-वडीलांपैकी एकाचा आधार कार्ड आणि ओळख पत्राची गरज लागेल. या दोन डॉक्युमेंट्सच्या मदतीने आपण आपल्या मुलांचे आधार कार्ड बनवू शकता. देशातील काही शहरांमध्ये असे हॉस्पिटल्स आहे जेथे जन्म घेतल्याबरोबर आधार कार्ड बनविण्यासाठी प्रक्रिया सुरु होते.
 
या प्रकारे करवा रजिस्ट्रेशन 
यूआयडीएआयच्या वेबसाइटवर जा आणि आधार कार्ड रजिस्ट्रेशनसाठी लिंकवर क्लिक करा. तेथे फॉर्म डाउनलोड करा आणि त्यात बाळाचे नाव, आपला मोबाइल नंबर, ईमेल पत्ता भरा. नंतर आपल्याला आधार कार्ड सेंटरसाठी ठराविक वेळ मिळल. आपल्या ठराविक दिवशी आधार एनरोलमेंट सेंटरवर जाऊन सर्व आवश्यक कागदपत्र घेऊन जायचे आहे.
 
या लिंकवर करा व्हिजिट 
आधार कार्डाशी संबंधित माहितीसाठी ask.uidai.gov.in लिंकवर क्लिक करा. लहान मुलांच्या आधारसंबंधी अधिक माहितीसाठी आपण  https://ask.uidai.gov.in/ लिंकवर व्हिजिट करु शकतात. एकदा आधार मिळाल्यावर सोप्यारीत्या पासपोर्ट, पॅन कार्ड, शाळेत एडमिशनसाठी अप्लाय करु शकता.
 
मुलांचे आधार कार्ड काढताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या 
5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रिक डिटेल्स घेतले जात नाही, केवळ फोटोची गरज असते. वयाच्या 15 वर्षानंतर बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट करवणे आवश्यक आहे. मुलांची बायोमेट्रिक्स अपडेट करणे अगदी मोफत आहे. बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची गरज नाही. बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी मुलांना त्यांच्या आधार कार्डासह केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.