मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (12:17 IST)

PNB चे ग्राहक असाल तर 31 मार्च पर्यंत हे काम नक्की करवा, नाहीतर व्यवहारामध्ये अडचणी येतील

जर आपण शासकीय बँक पंजाब नॅशनल बँकेचे खाताधारक असाल तर आपल्याला 31 मार्च पर्यतं काही आवश्यक कार्य पूर्ण करावे लागतील. नाहीतर आपला व्यवहार अटकू शकतात. पंजाब नॅशनल बँकेने ट्विटरद्वारे आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की आपल्या जुन्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोड 1 एप्रिल पर्यंत बदलावे. अर्थात 31 मार्च 2021 नंतर हे कोड काम करणार नाहीत. जर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला बँकेतून एक नवीन कोड घ्यावा लागेल.
 
उल्लेखनीय आहे की 1 एप्रिल 2020 ला सरकारद्वारे पीएनबी, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि यूनाइटेड बँक ऑफ इंडिया मर्जर झाले होते. पीएनबीमध्ये मर्ज झाल्यावर यूनाइटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या सर्व शाखा आता पीएनबीच्या शाखा या रुपात काम करत आहे. बँकेची 11,000 हून अधिक शाखा आणि 13,000 पेक्षा अधिक एटीएम आता कार्यरत आहे.
 
पंजाब नॅशनल बँकेने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  ट्विटरच्या माध्यामातून माहिती दिली होती. बँकेप्रमाणे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि यूनाइटेड बँक ऑफ इंडिया च्या जुन्या चेकबुक आणि IFSC/MICR Code 31 मार्च पर्यंत काम करतील. अर्थात एक एप्रिलपासून आपल्याला बँकेकडून नवीन कोड आणि चेकबुक घ्यावी लागेल. ग्राहक अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 18001802222/18001032222 वर कॉल करु शकतात.