शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (22:43 IST)

स्मार्टफोन पाण्याने भिजला आहे, अशा पद्धती ने ठीक करा, पूर्ववत होईल

पाण्यात पडल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे अनेक वेळा स्मार्टफोनच्या स्पीकरमधील आवाज कमी होतो किंवा कधी कधी स्पीकर काम करणं बंद करतो. जर आपण ही या समस्येने त्रस्त असाल तर हे काही उपाय करून आपण या समस्येला दूर करू शकता. हे उपाय जाणून घेतल्यास, आपण घरी बसल्या बसल्या सहजपणे फोन ठीक करू शकाल. हे करण्यासाठी आपल्याला फक्त एक अॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता आहे. चला तर मग जाणून घेऊया की पाण्यात भिजलेले स्मार्टफोन स्पीकर कसे ठीक करू शकता.
 
* सुपर स्पीकर क्लीनर- हे देखील स्पीकर क्लीनर अॅप आहे. स्पीकरच्या ब्लॉकेजची समस्या दूर करण्यासाठी काही बिल्ट-इन क्लिनर मोड दिले आहेत. वापरण्यासाठी, फोनचा स्पीकर डाऊन ठेवा. नंतर आवाज वाढवा. त्यानंतर अॅपमध्ये दिलेल्या प्रमाणे क्लिनींग प्रोसेस प्रारंभ करा. यामध्ये स्पीकर मधील पाणी काढण्यासाठी साउंड वेव्ह चा वापर केला जातो. 
 
* स्पीकर क्लीनर-फोन पाण्यात भिजल्यामुळे खराब झालेला स्पीकर दुरुस्त करण्यासाठी आपण फोनवर स्पीकर क्लीनर अॅप डाउनलोड करू शकता. अॅपचा दावा आहे की ते स्पीकरमधून 80 टक्के पाणी काढून टाकते. यासाठी अॅप साउंड वेव्ह वापरतो. साउंड व्हेव मुळे स्पीकर व्हायब्रेट करू लागतो आणि पाणी काढून टाकले जाते. यात ऑटो क्लीनिंग आणि मॅन्युअल क्लीनिंग सारखे मोड देखील आहेत. युजर्स ते Google Play Store वरून डाउनलोड करू शकतात.