रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (16:20 IST)

लाईट बिल जास्त आलय? घाबरू नका ‘ही’पद्धत आधी समजावून घ्या!

अनेकांना लॉकडाऊनमध्ये भरमाठ बिलं आली आहेत. त्यामुळे अनेकजण चक्रावले आहेत. पण आता घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं बिल समजावून घेऊ शकता. समजा ३ महिन्यासाठी ६१२ युनिट वापराचे वीज बिल आलेले असेल तर ६१२ युनिट आहेत म्हणून ५०० युनिटच्या वरील स्लॅब (११.७१ रुपये)लागलेला नसतो समजा हा स्लॅब लागलेला असेल तर वीज आकार ७१६६.५२ रुपये झाला असता किंवा ६१२ युनिट भागिला ३ महिने २०४ युनिट प्रति माह असे केले तरी २०४ युनिटला १०० च्या वरील स्लॅब लागलेला नसतो, असे झाले असते तर (२०४ युनिट७.४६दर३ महिने) वीज आकार ४५६५.५२ रुपये झाला असता.
 
वरील दोन्ही प्रकारे वीज आकार ठरत नसून आपण जेवढ्या महिन्यासाठी वापर केला तेवढ्या महिन्यासाठी वीज आकार स्लॅब व युनिट मध्ये विभागून दिले जाते. आपला वीज आकार प्रति माह २०४ युनिट असा हिशेब घेतला जातो आणि त्यात सुद्धा २०४ युनिटला सरसकट १०० च्या वरील स्लॅब न लावता खालील प्रमाणे आकारणी होते.
 
पहिल्या स्लॅब मध्ये १०० युनिट
१००*३.४६ प्रति युनिट दर = ३४६ रुपये
 
दुसरा स्लॅब मध्ये उरलेले १०४ युनिट
 
१०४* ७.४३ प्रति युनिट दर = ७७२.७२ रुपये
 
पहिल्या आणि दुसऱ्या स्लॅबची बेरीज (३४६ + ७७२.७२)= १११८.७२ रुपये अशा प्रकारे एका महिन्याची रक्कम काढून त्याला ३ महिन्याचे बिल असल्याने ३ ने गुणले जाते. १११८.७२* ३ महिने = ३३५६.१६ रुपये म्हणजेच वीज आकार हा ७१६६.५३ किंवा ४५६५.५३ आकारला नाही तर तो केवळ ३३५६.१६ रुपये असा आकारला गेला. सोबतच या तीन महिन्यांच्या आलेल्या रकमेतून मागील सरासरी बिलाची रक्कम देखील वजा केली जाते..
 
उदा समजा याआधी आपल्याला दोन महिने ५००-५०० रुपये असे सरासरी बिल आले असेल तर ती रक्कम या ३ महिन्याच्या आलेल्या रकमेतून वजा होते. (सरासरी बिलातील स्थिर आकार व त्यावरील वीज शुल्काची रक्कम सोडून) तसेच १ एप्रिल पासून नवीन वीज दर लागू झाले ले  आहेत. तसेच आपल्या बिलांवर चालू रिडींग दर्शविले असते तिथे त्याच्या खाली ३१ मार्च २०२० पूर्वीचे युनिट काढून दिलेले आहेत. आणि तेवढ्या युनिटवर जुने वीज दर लावण्यात आलेले आहे.
 
त्यामुळे कुठेही ग्राहकांचे नुकसान झालेले नाही किंवा बिल चुकले नाही. त्यामुळे कोरोनाच्या काळात सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, बिल चुकीचे आले म्हणून तक्रार घेऊन महावितरण कार्यालयात जाऊ नये. (टीप-फक्त आपले मिटर रिडींग चुकले असेल तरच आपले बिल चुकीचे आकारले जाऊ शकते. त्यामुळे रिडींग चुकीचे घेतले गेले असेल तर निदर्शनास आणून द्यावे.)