गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (12:09 IST)

मुंबईची काळी-पिवळी टॅक्सी, 60 वर्षांचा प्रवास अखेर संपणार, हे आहे कारण : सविस्तर रिपोर्ट

Kali pivali taxi
बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानातही खूप बदल झाले आहेत,आणि पुढे बदलत राहणार अआहे. हे खरे आहे.   आता प्रत्येक शहरात कॅबचा वापर जास्त झाला आहे. तुम्हाला कुठेही जायचे असेल तर ऑनलाइन कॅब उपलब्ध आहेत, फक्त थोडी औपचारिकता आहे आणि लोक सुखद प्रवासाचा आनंद घेत आहेत.

त्याचवेळी, गेल्या अनेक दशकांपासून, एक-दोन नव्हे तर जवळपास सहा दशकांपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या रस्त्यांवर काळ्या-पिवळ्या टॅक्सी धावताना दिसत आहे, आहेत. मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी या काळ्या-पिवळ्या 'प्रीमियर पद्मिनी' टॅक्सीचे चित्र त्यांच्या मनात घर करून आहे. ही टॅक्सी सेवा 'काली-पिली' टॅक्सी सेवा म्हणून ओळखली जात होती आणि मुंबईतील लोकांचे या टॅक्सी सेवेशी घट्ट नाते आहे. आता अशा लोकांसाठी एक दु:खद बातमी आहे, ती म्हणजे सोमवारपासून म्हणजेच 30 ऑक्टोबरपासून या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा ‘प्रवास’ संपयला सुरुवात होणार आहे, त्या सर्व आता क्रम क्रमाने कचरा अर्थात भंगार होणार आहेत.
 
काळी-पिवळी टॅक्सी संग्रहालयात ठेवण्याची मागणी
परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'प्रीमियर पद्मिनी'ची शेवटची टॅक्सी 29 ऑक्टोबर 2003 रोजी ताडदेव आरटीओमध्ये नोंदणीकृत झाली होती. ते म्हणाले की, शहरात कॅब चालवण्याची मुदत 20 वर्षे आहे, त्यामुळे सोमवारपासून 'प्रीमियर पद्मिनी' म्हणजेच काळ्या-पिवळ्या टॅक्सी अधिकृतपणे मुंबईतील रस्त्यावर धावणार नाहीत. मुंबईच्या शेवटच्या नोंदणीकृत प्रीमियर पद्मिनी टॅक्सी (MH-01-JA-2556) चे मालक प्रभादेवी म्हणाले, "हा मुंबईचा आणि आमच्या जीवनाचा अभिमान आहे."
 
पद्मिनीने 1964 मध्ये आपला प्रवास सुरू केला
त्याचवेळी संग्रहालयात किमान एक 'प्रीमियर पद्मिनी' जतन करावी, अशी मागणी मुंबईतील काही लोकांनी केली आहे. काही वर्षांपूर्वी 'मुंबई टॅक्सीमेन्स युनियन'ने सरकारला किमान एक काळी-पिवळी टॅक्सी टिकवून ठेवण्याची विनंती केली होती, पण त्यात यश आले नाही. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस एएल क्वाड्रोस म्हणाले की, 'प्रीमियर पद्मिनी'ने 1964 मध्ये 'फियाट-1100 डिलाइट' मॉडेलने टॅक्सी म्हणून आपला प्रवास सुरू केला. ही टॅक्सी आता आमच्या आठवणीत राहील.
 
मुंबईची काळी-पिवळी टॅक्सी, 60 वर्षांचा प्रवास अखेर संपणार, हे आहे कारण :
पद्मिनी प्रीमियर कंपनीच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी गेल्या 6 दशकांपासून मुंबईकरांची सेवा करत आहेत. मात्र आता ही टॅक्सी 30 ऑक्टोबरपासून रस्त्यावर दिसणार नाही. आता मुंबईच्या रस्त्यांवरून काळ्या-पिवळ्या टॅक्सी हटवण्यात येणार आहेत. त्यामागील कारण म्हणजे मुंबई शहरात टॅक्सी चालवण्याची मुदत 20 वर्षे असून काळ्या-पिवळ्या टॅक्सी गेल्या ६ दशकांपासून सुरू आहेत. प्रीमियर पद्मिनीची ही टॅक्सी1964 मध्ये मुंबईच्या रस्त्यावर धावू लागली होती. ही टॅक्सी प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेड (PAL) नावाच्या कंपनीने बनवली आहे. 2001 मध्ये कंपनीने प्रीमियर पद्मिनीचे उत्पादन बंद केले. 2008 मध्ये सरकारने टॅक्सींचे आयुष्य २५ वर्षे निश्चित केले होते, ते 2013 मध्ये 20 वर्षे करण्यात आले.
 
फक्त दोन गाड्यांचे वर्चस्व
स्वातंत्र्यानंतर देशात दोन वाहने खूप लोकप्रिय झाली. एक हिंदुस्थान मोटर्सची अॅम्बेसेडर आणि दुसरी प्रीमियर ऑटोची पद्मिनी कार होती. ही कार मजबूत आहे. त्याचे इंजिन लहान असायचे. त्यामुळे देखभाल खूप सोपी होती. ही कार ताशी 125 किलोमीटर वेगाने धावू शकते. मुंबईत सध्या 40 हजारांहून अधिक काळ्या-पिवळ्या टॅक्सी आहेत. त्या रविवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. 1990 च्या दशकात ही संख्या 60 हजार होती. 1960 च्या दशकात दिल्ली आणि कोलकाता येथे अॅम्बेसेडर कारचा दबदबा होता. त्याच वेळी पद्मिनी टॅक्सीने मुंबईवर राज्य केले.
 
Edited By - Ratnadeep ranshoor