मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (11:46 IST)

SBI मध्ये घरबसल्या Children Saving Account उघडा

लहानपणापासून मुलांमध्ये सेव्हिंगची सवय लावणे त्यांच्या भविष्यासाठी योग्यच ठरेल. अशात त्यांच्या नावाने अकाउंट असल्यावर त्यांना अधिक जवाबदारीची जाणीव होते. जर आपणही हाच विचार करुन आपल्या मुलांच्या नावानं बँक अकाउंट उघडण्याचा विचार करत असाल तर SBI ने नवीन सुविधा प्रदान केली आहे. 
हल्ली बँकांमध्ये आता मोठ्यांसोबतच लहान मुलांसाठीसुद्धा बचत खाती उघडले जात असून याने मुलांच्या भवितव्यासाठी पैशांची बचत करता येते. मुलांसाठी खाते उघडण्याचा फायदा म्हणजे हळूहळू त्यांच्यासाठी एक मोठा फंड तयार करणे.
 
SBI मध्ये पहला कदम आणि पहली उडान या योजनेअंतर्गत बँक खाती उघडण्याची संधी आहे. यासाठी बँकेत न जाता देखील आपलं काम घरबसल्या होऊ शकतं.
 
Pehla Kadam Saving Account
या योजनेत कोणत्याही वयोगटातील अल्पवयीन मुलं आणि पालक एकत्रित खाते उघडू शकतात.
पालक किंवा मुलं या खात्यावरून व्यवहार करू शकतात.
अल्पवयीन मुलं आणि खातेधारकाच्या नावानं हे कार्ड मिळेल.
 
फायदे
या अकाउंटद्वारे आपण दररोज 2 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता.
मोबाईल बँकिंग सुविधा असल्याने आपण कोणत्याही प्रकारचे बिलदेखील भरता येतील.
या खात्यावर एटीएम कार्डची देखील सुविधा मिळेल. ज्यातून आपण5 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता.
इंटरनेट बँकिंगची सुविधा असून याद्वारे 5 हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार करू शकता.
यात पालकांसाठी वैयक्तिक अपघात विमा देखील मिळणार आहे.
 
Pehli Udaan Saving Account
ही खाते उघडण्याची संधी त्यांना आहे जी मुलं 10 वर्षांपेक्षा मोठी असून त्यांना स्वत:ची स्वाक्षरी करता येते.
हे खातं पूर्णपणे अल्पवयीन मुलांच्या नावावर असेल.
 
फायदे
या खात्यात एटीएम कार्डची सुविधा मिळते ज्यातून आपण 5 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता
मोबाइल बँकिंगच्या सुविधा असून 2 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता.
इंटरनेट बँकिंगमध्ये दररोज 5 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येऊ शकतो.
यात चेकबुकची सुविधा देखील मिळेल.
 
मुलांसाठी या प्रकारे उघडा बचत खातं
आधी एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा. 
पर्सनल बँकिंगवर क्लिक करा.
अकाउंट्स टॅबवर क्लिक करा.
सेव्हिंग अकाऊंट ऑफ मायनर्स पर्याय निवडा.
अप्लाय नाउवर क्लिक करा. 
आपल्याला डिजिटल आणि इंस्टा सेव्हिंग खात्याची पॉप-अप फीचर्स दिसतील, ते बंद करा.
मग SBI YONO वेबसाइट उघडेल.
याठिकाणी ओपन ए डिजिटल अकाउंटवर क्लिक करा.
पुन्हा एकदा अप्लाय नाउवर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा. 
नंतर जवळीक शाखेतला एखादा कर्मचारी घरी चौकशीसाठी येईल. 
अशाने मुलाचे बचत खाते सुरु केले जाईल. 
 
ही दोन्ही बचत खाती ऑनलाइन आणि ऑफलाइन देखील उघडली जाऊ शकतात.